राजकीय

हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

टीम लय भारी
मुंबई:- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्रालयामध्ये जाऊन फाईल्स चेक केल्याने बराच गोंधळ उडाला होता. किरीट सोमय्यांचा खुर्चीवर बसून फाईल चेक करतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दोन दिवसांपूर्वी राज्यसरकारकडून किरीट सोमय्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. अशातच आता किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.( Kirit Somaiya’s challenge to the Chief Minister, file a case against me)

फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत आहेत. दोष काय तर मी खुर्चीवर बसलोय. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहेत. उद्धव ठाकरे जे खोटं बोलले ती चोरी मी पकडली. त्याचा राग ते कर्मचाऱ्यांवर काढत आहेत.

हे सुद्धा वाचा

अमित शहांचा अखिलेश यादव यांच्यावर घणाघात

गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर सणसणीत टीका

भाजप नेते केशव उपाध्ये यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

At meet led by Shah, BJP reaches out to Jats, sends feeler to Jayant

एका गरीब टायपिस्ट लिपिकाला तुम्ही नोटीस देताय. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री बघा, अशी खोचक टोला किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

राजकीय भ्रष्टाचार तुम्ही करताय. लढाई करायची असेल तर माझ्याशी करा. त्या गरीब लिपिकाला नोटीस पाठवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना त्या लिपिकाला कुटूंबाची माफी मागावी लागणार आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश  मंत्रालयाला दिले आहेत. परंतु, मंत्रालय त्यांचे आदेश पाळत नाही, असा टोलाही सोमय्यांनी लगावला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांनी बोलतांना मुख्यमंत्र्यांना आव्हान देखील केलं आहे. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य  ठाकरेंना आव्हान आहे की, तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यावर एफआयआर दाखल करा. त्या गरीब लिपिकाला नोटीस पाठवतांना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Pratikesh Patil

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

10 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

11 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

11 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

12 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

14 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

14 hours ago