राजकीय

किरीट सोमय्यांचा लिस्टमध्ये आणखी दोन बड्या नेत्यांचा समावेश

टीम लय भारी

मुंबई – बुधवारी ईडीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात केलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच राज्यात केंद्र विरुद्ध राज्य असा सामना सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे.(Kirit Somaiya’s list includes two other big leaders)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांची लिस्ट सोमय्या यांनी जाहीर केली आहे. यामध्ये आणखी दोन नावांचा समावेश करण्याचे मी विसरलो होतो. यामध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचे कुटुंब आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. मी आज ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले आहे.

दरम्यान तपास यंत्रणेकडून शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी करण्यात येत आहे. यशवंत चव्हाणांच्या घरी आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडारावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे लागणार असल्याचे सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्यांचा धक्कादायक खुलासा; देशमुख-मलिकांनंतर आता नंबर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा

किरीट सोमय्या यांचा धक्कादायक आरोप, संजय राऊत यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे

पवारांच्या जावयांकडे इतके पैसे कसे ? किरीट सोमय्यांचा सवाल

‘Dirty dozen’ would be behind bars soon: Kirit Somaiya

 आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागाने छापा घातला आहे. सकाळी सहा वाजता जाधवांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे. दरम्यान, य पथकासोबत सीआयएसएफ पथकही असल्याची माहिती मिळत आहे.

 भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांची नावे जाहीर केली आहेत.

अनिल देशमुख- नवाब मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आहे. पवार आणि ठाकरे यांच्यावर खरंच ईडी कारवाई करेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago