राजकीय

इंडिया आघाडी बैठकीच्या तयारीसाठी नेत्यांची लगबग वाढली; ग्रँड हयातला भेट देऊन केली पाहणी

३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचे बैठक मुंबई मध्ये होणार आहे. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून आज महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष माजी मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, शिवसेना खासदार संजय राऊत, खा. अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र वर्मा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, संदीप पांडे उपस्थित होते. या नेत्यांनी ग्रँड हयात हॅाटेलची पाहणी करून तिथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच बैठकीच्या तयारी बाबत चर्चा केली.

शरद पवारांसह इंडिया आघाडीचे अनेक नेते ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात उपलब्ध नाहीत त्यामुळे मुंबईतली बैठक लांबणीवर पडली आहे. आधी ही बैठक 25 आणि 26 ऑगस्टला ठरली होती, पण आता इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. काही नेत्यांनी आपण ऑगस्ट महिन्यात उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं. या नेत्यांमध्ये शरद पवारांचादेखील समावेश असल्याची माहिती समोर आली होती. कारण 16 ऑगस्ट रोजी शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे 25 आणि 26 ऑगस्ट रोजी आपण मुंबईत उपलब्ध असू शकणार नाही, असं पवारांनी कळवल्याची माहिती समोर आली आहे. 26 पक्षांच्या विरोधी आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची पुढील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. इंडिया आघाडीने यापूर्वी सांगितले होते की, या बैठकीत ते आघाडीची समन्वय समिती, संयुक्त सचिवालय आणि इतर पॅनेलसाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत. इंडिया आघाडीची मुंबईतील बैठकीचे आयोजन शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे करणार आहेत. याबैठकीत प्रचार, प्रसारमाध्यमे आणि आंदोलनासाठी इंडिया आघाडीकडून समित्या स्थापन करण्यात येतील.

हे सुद्धा वाचा
राज्यात लवकरच पाळणाघरे; नोकरदार, कामानिमित्त बाहेर असणाऱ्या पालकांची चिंता मिटणार!
रेल्वेच्या धर्तीवर राज्यातील एसटी स्थानकांचा पुनर्विकास करा! -अर्थमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना आदेश
संभाजीनगरात काळया धंद्यांना सोन्याचे दिवस; अवैध धंद्यांशी संबंधितांवर गृहमंत्री फडणवीस कारवाई कधी करणार ? जनतेचा थेट सवाल

18 जुलै रोजी बेंगळुरूच्या बैठकीनंतर, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं होतं की, ‘मुंबईत 11 सदस्यीयसमन्वय समिती स्थापन केली जाईल. प्रचार व्यवस्थापन आणि संयुक्त रॅली आणि कामकाजासाठी केंद्रीय सचिवालय देखील स्थापन केले जाईल. 11 सदस्यीय समन्वय समिती सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतील. यांच्याद्वारे संवादाचे मुद्दे, संयुक्त रॅली, जागावाटप आणि विरोधी आघाडीच्या अशा इतर बाबींसह निवडणूक आणि राजकीय रणनीतीची भविष्यातील वाटचाल ठरवली जाईल. मुंबईच्या बैठकीत आघाडी अध्यक्षाची निवड करण्यात येईल, असंही खरगे यांनी स्पष्ट केलं होते. राहुल गांधी यांचे संसदेत पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उत्साहात आहेत. या बैठकीचे यजमान पद शिवसेना उद्धव ठाकरे यांनी घेतले आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची देश पातळीवरची इमेज ठाकरे गटाला तयार करायची असल्याने सरबराईत कोणतीही उणीव भासू नये यासाठी खासदार संजय राऊत पुढे सरसावले आहेत.

विवेक कांबळे

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

3 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

4 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

5 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

5 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

6 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

6 hours ago