Categories: राजकीय

गोपीचंद पडळकरांमुळे महादेव जानकरांची पंचाईत

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने बारामतीमधून उमेदवारी दिली आहे. पण या उमेदवारीमुळे पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. कुणाला सांगताही येईना, अन् कळ दाबूनही ठेवता येईना अशी अवस्था जानकर यांची झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करीत पडळकर यांना भाजपमध्ये घेतले. प्रवेश देताना पडळकर यांचे तोंड भरून कौतुकही केले. धनगरांचे नेते म्हणून पडळकरांना फडणवीस यांनी पोचपावती दिली, आणि अत्यंत सहजपणे बारामतीची उमेदवारीसुद्धा घोषित केली.

महादेव जानकरांच्या पक्षाला जागांचे नुसतेच गाजर

दुसऱ्या बाजूला महादेव जानकर यांच्या पक्षासाठी जेमतेम दोन जागा दिल्या, पण त्याही कमळ चिन्हावरच. त्यामुळे जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला एक प्रकारे ठेंगाच दाखविल्यासारखे आहे. जागा दिल्यात असे वरून दाखवायचे, पण प्रत्यक्षात मात्र दोन्हीही जागा भाजपच्याच पदरात गेल्यासारखे आहे.

लोकसभेतही डावलले

लोकसभा निवडणुकीतही जानकर यांना एकसुद्धा जागा दिली नव्हती. उलट जानकर यांच्याच पक्षाचे आमदार राहूल कूल यांच्या पत्नी कांचन कूल यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. जानकर यांनी सन 2014 मध्ये बारामतीमधून मोठे मताधिक्य मिळविले होते, त्याच बारामतीमध्ये जानकरांना डावलून कूल यांना उमेदवारी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीमध्ये भरपाई करून दिली जाईल, अशी समजूत त्यावेळी भाजपने घातली होती. पण आता विधानसभेला अवघ्या दोन जागा दिल्या आहेत. त्या दोन्ही जागा तशा भाजपच्याच पारड्यात पडणाऱ्या आहेत. त्यामुळे जानकरांच्या हाती काहीच लागलेले नाही.

पडळकर हे जानकरांचे शिष्य

गोपीचंद पडळकर हे महादेव जानकर यांचेच पुर्वाश्रमीचे शिष्य आहेत. परंतु पडळकरांचा झंझावात व जानकरांचा एकला चलो रे भूमिका यांमुळे दोघांचे पटेना. त्यातून पडळकर बाहेर पडले, व सन 2012 च्या दरम्यान भाजपमध्ये दाखल झाले. पण मागोमाग जानकर हे सुद्धा गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून भाजपच्या सोबतीला आले. नंतर मंत्री सुद्धा झाले. जानकर भाजपच्या जवळ आल्यामुळे पडळकरांचे पंख छाटण्यात आले. पण पडळकर यांनी 2018 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली. धनगर समाजाच्या प्रश्नावर त्यांनी राज्यभरात रान पेटवले. लोकसभा निवडणुकीत जवळपास 4 लाख मतदान घेतले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पडळकरांवर फिदा झाले. सध्या भाजपने जानकर यांना काहीसे दूर केले आहे, त्या ऐवजी धनगर समाजात ताकद निर्माण केलेल्या पडळकरांना त्यांनी जवळ केल्याचे दिसत आहे.

पडळकरांना सहकार्य करणे एवढेच जानकरांच्या हातात

बारामती हा जानकरांनी बालेकिल्ला बनविण्याचे प्रयत्न केले होते. पण सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जानकरांना तिकिट दिले गेले नाही. त्यामुळे बारामतीवरील त्यांचे वर्चस्व निसटले. आता याच बारामतीमध्ये पडळकर यांना विधानसभेचे तिकिट दिले गेले आहे. पडळकर यांच्याविषयी जानकरांना किती ‘प्रेम’ आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे पडळकरांना मदत करणे जानकरांच्या पचनी पडणारे नाही. पण भाजपसोबतच्या युतीत ते सहभागी आहेत. त्यामुळे पडळकरांना मदत करा किंवा करू नका, असे सांगणेही त्यांच्या जिवावर येत असल्याचे चित्र आहे. मुळातच बारामतीमधील भाजपचे कार्यकर्ते व धनगर व्होट बँक यांच्या बळावरच पडळकरांचे यशापयश अवलंबून असणार आहे. जानकर यांच्या रासपचे बहुतांश कार्यकर्ते हे धनगर समाजातच आहेत. ते पडळकरांनाच मदत करतील. त्यामुळे जानकर यांनी सहकार्य केले किंवा नाही केले तरी पडळकरांना फारसा फरक पडणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

तुषार खरात

Recent Posts

सुजय विखेंचा रडीचा डाव !

डॉ. सुजय विखे पाटील (Dr.Sujay Vikhe Patil) यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय. पण पराभव स्विकारण्याची…

12 hours ago

महात्मा गांधी मु्स्लिमधार्जिणे होते का ? ( ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा लेख)

महात्मा गांधींजींशी संबंधित प्रसंग १ - हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेनने निघाले…

14 hours ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

1 week ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

1 week ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

1 week ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

1 week ago