राजकीय

Mahatma Gandhi | Bhaurao Patil | कर्मवीर भाऊराव पाटील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी

देशातील एकूण परिस्थितीचा विचार करता भारतात क्वचित अशी एखादी व्यक्तीआढळेल किंवा एखादी संस्था असेल की जिच्या धोरणावर किंवा जीवनदृष्टीवर महात्मा गांधींच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचा परिणाम घडून आलेला नाही(Mahatma Gandhi and Karmaveer Bhaurao Patil). यानियमाला कर्मवीर भाऊराव पाटील हे देखील अपवाद असलेले दिसत नाहीत.’लय भारी’ ने काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केलेल्या ‘गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलंयका.”या विशेषांकात ज्येष्ठपत्रकार चंद्रकांत दळवी आणि डॉ. विद्या नावडकर यांचा कर्मवीर भाऊराव पाटील व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा परस्पर संबंधांविषयी भाष्य करणारा लेख वाचकांसाठी उपलब्ध आहे . या लेखात ते काय म्हणतात पाहूया.महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाच्या विरोधात अतुलनीय कार्य केलेले दिसते. जिद्द,त्याग आणि जनसंघटन यातील त्यांचा हातखंडा जगासाठी एक नवा आदर्श ठरला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा फार मोठा प्रभाव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडलेला दिसतो. एक नवी जीवन दृष्टीघेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतेचा वटवृक्ष महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर पोहोचवला.भाऊराव पाटील गांधीजींना ‘शाहू बोर्डिंग हाऊसच्या नामकरण समारंभासाठी’ सोमवार पेठेकडे घेऊन चालले होते. तेव्हा गांधीजींनी त्यांना विचारले तुम्ही तुमच्या संस्थेला हे नाव का देता? महाराजांनी तुम्हाला खूप पैसे दिले आहेत काय? गांधीजींनी ही अगदी सहज विचारणा केली होती. पण प्रश्न खरोखरच अर्थपूर्ण होता.यावेळी भाऊरावांनी नम्रपणे काढलेले उद्गार फार महत्त्वाचे होते. ते महात्माजींना म्हणाले की, ‘शाहू महाराजांनी मला काहीही मदत केली नाही. परंतु बहुजनसमाजाच्या उद्धाराची मला जी प्रेरणा लाभली ती त्यांच्याकडूनच.’ छत्रपती शाहू महाराजांना बहुजन समाजाच्या शिक्षणासंबंधी आस्था वाटत होती, याची भाऊरावांना जाणीव होती. गेली अनेक शतके अज्ञानात आणि निराधार अवस्थेत आपले आयुष्य जगत असलेल्या महाराष्ट्रातील मागास समाजाला पुढे नेण्यातशाहू महाराजांचा खूप मोठा सहभाग होता. हाच कर्मवीरांचा महत्तम आदर्श होता.खरंतर एखाद्या निष्ठावंत नागरिकाच्या शैक्षणिक कार्याला सरकारने मदत करावी असे गव्हर्नरचे मत होते आणि म्हणूनच तेव्हापासून ‘शाहू बोर्डिंगहाऊसला’ सरकारकडून वार्षिक अनुदान मिळू लागले. पहिल्या वर्षी मुंबईसरकारने पाचशे रुपये दिले. आणि दरवर्षी या रकमेत वाढ होऊन १९३७-३८पर्यंत ही रक्कम २४६० पर्यंत येऊन पोहोचली होती. खरंतर ही रक्कम संस्थेला मिळण्याचे कारण स्वतः महात्मा गांधीजी हेच होते. एकाच वेळेला सरकार आणि गांधीवादी आंदोलन यांच्याकडून रयत शिक्षण संस्थेला सलग चार वर्षे नियमित अनुदान मिळाले. गांधीजींनी भाऊरावांच्या ‘बोर्डिंग हाऊसला’ वार्षिक पाचशे रुपयेयाप्रमाणे जवळजवळ चार वर्षे अनुदान दिले. त्यानंतरही त्यांची आण्णा आणिरयत शिक्षण संस्था यांच्या विषयीची आस्था कमी झालेली दिसून येत नाही.महात्माजींनी भाऊरावांसंबंधी अखेरचे लिहिले ते त्यांच्या शेवटच्या काळाच्या अगोदर. सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी संघटनेच्या वतीने भाऊरावांसाठी एकलाख रुपयांचा निधी जमवला होता. ही थैली कर्मवीरांना गांधीजींच्या हस्ते दिलीजावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा होती. पण गांधीजींना येता येण्यासारखे नव्हते.म्हणून या समारंभासाठी त्यांनी आवर्जून संदेश पाठविला होता. आपल्या संदेशातते म्हणतात -‘भाऊरावांचे सेवाकार्यहेच त्यांच्या लौकिकाचे खरेखुरे स्मारक आहे. असे असलेतरी भाऊरावांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी निधी जमविला हेत्या विद्यार्थ्यांनाही भूषणावह आहे. समाजकार्य करण्यासाठी भाऊरावांना दीर्घायुष्य लाभो.’एकूणच राष्ट्रपिता व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संबंध अद्वैत स्वरूपाचे होते.सामाजिक जाणिवेची व्यापकता त्याला लाभलेली होती.लय भारीच्या ‘’गांधी-नेहरूयांनी देशाचं खरचं नूकसान केलं का.’’या विशेषांकांत देशातील ४५ पेक्षा जास्त मान्यवरांचे लेख आहेत.यात शरद पवार, राजदीप सरदेसाई ,श्रीराम पवार, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर आदींचा समावेश आहे..हा विशेषांक खरेदी करण्यासाठी आपण ९८२१२८८६२२या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

8 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

8 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

9 hours ago