राजकीय

माळशिरसची एनसीपी कार्यकारणी बरखास्त; उत्तम जानकरांनी पक्षाकडे केली होती तक्रार

टीम लय भारी

सोलापूर :-  राष्ट्रवादी काँग्रेसने माळशिरस तालुक्यातील कार्यकारिणी बरखास्त केली आहे. मागील विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी पक्षाकडे तक्रार केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी माळशिरस तालुक्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे (Malshiras NCP Uttam Jankar complaint with the party).

विधानसभा निवडणुकांपूर्वी ही कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. माणिक वाघमोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी होते. त्याचबरोबर तालुक्याची कार्यकारिणी नियुक्त झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी माणिक वाघमोडे यांच्या निवडीबाबत पक्षाकडे तक्रार केली होती. उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत (Uttam Jankar is a leader of Dhangar Samaj).

कोरोनानंतर देशात झिका व्हायरसचा शिरकाव; केरळमध्ये पहिला रुग्ण…

वर्ध्यात उदय सामंतांसमोर सेनेच्या दोन गटात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात अनेक राजकीय समीकरण जुळून आली होती. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्याचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरस विधानसभेचे तिकीट हे उत्तम जानकर यांना देण्यात आले होते. मात्र उत्तम जानकर याचा या ठिकाणी पराभव झाला होता. भाजपचे राम सातपुते याठिकाणी विजयी झाले होते.

उत्तम जानकर

राणेंच्या टीकेला विनायक राऊत यांचे सडेतोड उत्तर

Mumbai: NCP neta says action is politically motivated

आता उत्तम जानकर यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आपल्या नियंत्रणाखाली असावी, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली होती. यावरून माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे (Malshiras NCP executive has been sacked).

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

12 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

12 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

13 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

14 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

15 hours ago