राजकीय

माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू – नरेंद्र पाटील

टीम लय भारी

मुंबई – माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन व सहकार आणि अन्य खात्याअंतर्गत असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन च्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. महाराष्ट्र शासनाचे विविध खात्यांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती देताना माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले की वर्षानुवर्षे या प्रश्नांची निवेदने सरकारकडे सादर केली बैठका झाल्या. परंतु प्रलंबित प्रश्नांची सरकारने सोडून केलेली नाही त्यामुळे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, माथाडी मंडळात पुर्णवेळ चेअरमन/सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणुका करणे, बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडी/तोलणार कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे, कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे आवार व अन्य ठिकाणी मालाचे वजन 50 किलो ठेवण्याबद्दलची अंमलबजावणी होणे, शासनाने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणा-या फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा मालावरील नियमण काढण्याचा 05 जुलै, 2016 चा शासन अध्यादेश रद्द होणे, नाशिक जिल्ह्यातील माथाडी/मापारी-तोलणार कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नांची सोडवणुक होणे, माथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतुद करणे व माथाडी कामगारांवर गुंडगिरी करणा-यांचा पोलीस यंत्रणेमार्फत बंदोबस्त करण्यासाठी समिती गठीत करणे, वर्क ऑडर्रच्या नांवाखाली माथाडी कामगारांची हक्काची कामे बळकावणा-या व कामगारांवर गुंडगिरी करणा-यांचा बंदोबस्त करणे, पिंपरी, पुणे येथिल मे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीकडील व अन्य माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे, गुलटेकडी मार्केट, पुणे येथिल कामगारांच्या टोळी पध्दतीच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे, कळंबोली स्टील यार्ड व विविध रेल्वे यार्डातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे, कोल्हापूर रेल्वे यार्डातील कामगारांचे प्रश्न, ग्रेन डेपो- शिवडी येथील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे आदी प्रश्नांची सोडवणुक होण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे संबंधित खात्याचे मंत्री महोदय, कामगार आयुक्त कार्यालय व संबंधितांकडे निवेदने सादर केली आहेत, परंतु या न्याय प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे संबंधितांनी लक्ष दिलेले नाही, त्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून, कामगारांना आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन व आमरण उपोषण करणे भाग पडत असल्याचे माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.
माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सरकारने आता सोडून करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे अन्यथा आमदारांचा तीव्र आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा देखील दिला.माथाडी कामगारांच्या या धरणे आंदोलनास आमदार आशिष शेलार,शिवाजीराव पाटील-निलंगेकर, आमदार निरंजन डावखरे,अभिमन्यू पवार,मदन येरावत आदींनी भेट व  पाठींबा दिला.
माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धरणे व उपोषण आंदोलनात युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील इतर पदाधिकारी आणि बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, लातूर, सातारा, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील व्यवसायात काम करणारे हजारो प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते
Pratiksha Pawar

Recent Posts

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

27 mins ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

56 mins ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

1 hour ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

2 hours ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

17 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

17 hours ago