Categories: राजकीय

आमदार नरेंद्र पवारांचा भाजपाला ‘अखेरचा दंडवत’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षाला फेसबुकवरून अखेरचा रामराम ठोकला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं नरेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टवरुन जाहीर केलं आहे.

आज खूप जड अंतःकरणाने एक कटू निर्णय मला घ्यावा लागतोय. महायुतीने विधानसभा जागावाटपात शिवसेनेला कल्याण पश्चिमची जागा सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. यावरुन व्यथित होऊन मी 1 ऑक्टोबर 2019 रोजी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मी कल्याण पश्चिम विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आज मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे.’

-नरेंद्र पवार  (फेसबुक पेजवर)

शिवसेनेने कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा भाजपकडून मागून घेतली होती. या जागेवरुन आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. अखेर विश्वनाथ भोईर यांना शिवसेनेने तिकीट दिलं. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी मैदानात आहेत. नरेंद्र पवार यांनी पक्षाने कारवाई करण्यापूर्वीच बाहेर पडणं पसंत केलं. ते आता ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हासह अपक्ष लढत आहेत.

‘अशा प्रकारे मला भारतीय जनता पार्टीपासून दूर जावे लागेल, असा साधा विचारही कधी मनात आणला नव्हता. मात्र मी कदाचित कुठे कमी पडलो,  मलाही कल्पना नाही. 2014  मध्ये युती नसताना भाजपाच्या तिकीटावर मी कल्याण पश्चिम विधानसभा लढवली आणि जिंकून आलो. पक्षाने मला काम करण्याची संधी दिली तेव्हा मी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम केलं.’ अशा शब्दात नरेंद्र पवारांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.

मला मनापासून दु:ख होत आहे…

मी अविरतपणे काम करुनही आता विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमची जागा घटक पक्षाला सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. ज्या भारतीय जनता पार्टीने मला घडवलं, वाढवलं आणि माझ्यातला जनसेवक जागृत ठेऊन सेवा करण्याची प्रेरणा दिली त्या पक्षाला माझ्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये, अशी माझी भूमिका आहे. काही निर्णय वाईट असतात मात्र ते घ्यावे लागतात. आज हा निर्णय घेताना मला मनापासून दु:ख होत आहे. काम करत असताना माझ्याकडून कोणी दुखावले गेले असेल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत नरेंद्र पवारांनी पक्षाला रामराम ठोकला.

तुषार खरात

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

8 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

9 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

11 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

12 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago