राजकीय

मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची उडविली खिल्ली

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट कामगिरी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमधून नंबर वन आले आहेत. मात्र, यावरून मनसेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या वर्गातील एका मुलाचे उदाहरण देत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत टोला लगावला आहे (MNS Sandeep Deshpande mocked the Chief Minister).

देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर वन ठरल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता. यावरून संदीप देशपांडे म्हणाले की, आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असेच मुख्यमंत्र्यांचे आहे. अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

वसई समुद्रकिनाऱ्यावर एकाच आठवड्यात 2 मृतदेह

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन, वाढदिवसा दिवशीच घेतला जगाचा निरोप

प्रश्नम या संस्थेने जाहीर केलेल्या त्रैमासिक अहवालात भारतातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत. मात्र यावर संदीप देशपांडे म्हणाले नंबर एक असण्यासाठी कामे करावी लागतात. दीड वर्षात काय केले? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला (What have you done in a year and a half? This question was asked by Sandeep Deshpande).

ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झाले तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? या सरकारने काय कामे केली आहेत? शाळेच्या फीचा प्रश्न आहे. व्यापारी नाराज आहेत, हे वसुली सरकार हफ्तेखेरी करतोय. दुकाने बंद, रेल्वे बंद, लोक घरात, वेठीस धरण्याचे काम होतेय, असेही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

आदित्य ठाकरेंचा ‘या’ नव्या योजनेला ग्रीन सिग्नल

Uddhav Thackeray, Shivraj Singh Chouhan most popular CMs in 13-state approval ratings

सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, वेठीस धरू नये. आपसातली लफडी बाजूला ठेवावी, रुग्णसंख्या कमी झाली आहे. जनतेला वेठीस का धरता? निर्बंध का उठवत नाही? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला. विषय आक्रमक हेण्याचा नाही, सरकारला परिणाम भोगावे लागणार. मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की रेल्वे सुरू करा, पण त्यांना घरातच बसून राहायचे आहे अशी टीका ही देशपांडेंनी केली.

यावेळी देशपांडेंनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी सुरु आहे, अशी माहितीही दिली. कोव्हिड काळात मनसेने केलेल्या कामाचा जनतेच्या मनावर मोठा परिणाम आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः यामध्ये लक्ष देत आहेत, असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे (MNS president Raj Thackeray himself is paying attention to this, said Sandeep Deshpande).

Rasika Jadhav

Recent Posts

नाशिक महानगरपालिकेच्या पथदर्शक फलकावरील पत्रे धोकादायक स्थितीत, गडकरी चौकात पत्रे कोसळले

सिंहस्थ कुंभमेळ्यात रस्त्यांची माहिती देण्यासाठी शहरात बसविलेल्या कमानींवरील पथदर्शक फलकांच्या पत्र्यांची ( Letters collapse) स्थिती…

6 mins ago

फिक्की व महाराष्ट्र चेंबरतर्फे पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधींवर चर्चासत्र

फिक्की व महाराष्ट्र चेंबरच्या पाठिंब्याने ARISE स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) च्या माध्यमातून पश्चिम आणि मध्य…

35 mins ago

भुसावळ दुहेरी हत्याकांड : तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ येथील भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणी (double murder)…

14 hours ago

बलशाली भारतासाठी भाजपा, देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल

आपल्या देशात नकारात्मक बातम्यांची जास्त चर्चा होते हे सत्य आहे. आपल्या शेजारच्या राष्ट्रांमधल्या किंवा आंतरराष्ट्रीय…

15 hours ago

कच्चं आलं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर

भारतात आल्याचा चहा खूप फेमस आहे. आलं (raw ginger) भाजीत सुद्धा टाकलं जातं. तुम्हाला माहित…

15 hours ago

आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त (World Anti-Tobacco Day) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी…

16 hours ago