राजकीय

छत्रपती घराण्याचं काम हे लोकांना न्याय देण्याचं आहे, लोकांना पेटवण्याचं नाही : खासदार संभाजी छत्रपती

टीम लय भारी

मुंबई :- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. मराठा समाज आणि संभाजीराजे (Sambhaji Raje) आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून समाजिक व राजकीय वातारण ढवळून निघाले आहे. छत्रपती घराण्याचं काम लोकांना न्याय देण्याचं आहे, लोकांना पेटवण्याचं नाही, असे खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटले आहे (MP Sambhaji Chhatrapati has said that the job of Chhatrapati family is to give justice to the people, not to burn the people).

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आले आहे.

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने संभाजीराजेंचं शिवभक्तांना आवाहन

अखेर १२ वीच्या परीक्षा रद्द, ठाकरे सरकाराचा निर्णय!

Mehul Choksi’s deportation case adjourned by Dominica court, next hearing likely in July

संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी ट्विट करून आपली भूमिका व्यक्त केली आहे. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, असे संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी म्हटले आहे.

जीव सुरक्षित ठेवणे हे महत्त्वाचे

ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे. कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असा टोलाही संभाजी छत्रपतींनी (Sambhaji Chhatrapati) लगावला आहे.

घरीच राज्यभिषेक सोहळा साजरा करा

संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी काल ट्विट करून शिवराज्यभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान केले होते. ‘मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज ! दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत’, असे संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले.

पुढील दिशा राजसदरेवरून जाहीर करणार

त्याचबरोबर ‘सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी..! माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन’, असे ही संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

40 mins ago

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

18 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

21 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

22 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 days ago