राजकीय

नाना पटोलेंच्या मागणीला यश; फोन टॅपिंग प्रकरणा संदर्भात समिती गठीत

टीम लय भारी

मुंबई :- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरले आहे. या अधिवेशनात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी फोन टॅपिंगचा मुद्यावर जोरदार चर्चा झाली होती. नाना पटोलेंनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर रीतसर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. फोन टॅपिंग मुद्द्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर आज शासनाने निर्णय जारी करण्यात आला आहे (Nana Patole demand regarding phone tapping case).

फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी करणार आहे. चौकशीनंतर तीन महिन्यात अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीतील फोन टॅपिंग प्रकरणाची ही चौकशी आहे (This is an investigation into a phone tapping case over a five-year period from 2015 to 2019).

मोदी सरकार देशाचे वैभव विकत आहे; नाना पटोलेंची मोदी सरकारवर बोचरी टीका

मोदी सरकार हे जुलमी सरकार आहे, नाना पाटोलेंचा खोचक टोला

फोन टॅपिंग हा गंभीर मुद्दा आहे, यावर कारवाई व्हायला हवी असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याबाबतची सर्व वस्तुस्थिती पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, असे यात सांगण्यात आले आहे. सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असतील, तर राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त सदस्य असतील. या समितीला 2015 ते 2019 या 5 वर्षांच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणांची पडताळणी करुन पुढील तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी नाना पटोलेंनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले होते. यात माझा नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला असा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला. तसेच, हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, माझे अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? असा सवाल नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला (This question was raised by Nana Patole in the House).

नाना पटोले

भांडुपचा ऑक्सिजनमॅन विशाल कडणे यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक!

Maharashtra Panel To Probe Phone-Tapping Allegations By State Congress Chief

माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा घणाघातही नाना पटोलेंनी सभागृहात केला होता.

फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याची माहिती घेऊ, असे आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहाला दिले होते.

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago