राजकीय

नाना पटोलेंनी दिला विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेसच्या अंतर्गत बदलात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची फरपट

टीम लय भारी

मुंबई :  नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे ( Nana Patole resigned as Vidhansabha president ). उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपविला आहे.

पटोले आता लवकरच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील ( Nana Patole will be next Congress’ state president ).

प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोले यांच्या नावाला पक्षश्रेष्टींकडून हिरवा कंदील मिळाला आहे ( Sonia Gandhi and Rahul Gandhi given green signal to Nana Patole ). त्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसची फरपट

काँग्रेसने पक्षांतर्गत बदलांसाठी निर्णय घेतले. पण या निर्णयामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचीही फरपट झाली आहे. विधानसभाध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसलाही आता सहभागी व्हावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

सचिन तेंडूलकर, विराट कोहली, लता मंगेशकरांवर सोशल मीडियात टीकेचा भडीमार

Maharashtra Assembly Speaker Nana Patole Resigns from Post, Likely to Be Named State Congress Chief

बाळासाहेब थोरात यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद

काँग्रेस पक्ष अडचणीत असतानाच्या काळात बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तम यश आले ( Balasaheb Thorat had done excellent work in Vidhansabha election ). त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद ठेवावे असा काँग्रेसमधून मोठा सूर होता.

असे असले तरी काँग्रेसमधील एक मोठा गट प्रदेशाध्यक्षपदाच्या पदासाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे कान भरण्यात गुंतला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाना पटोले हे नवे प्रदेशाध्यक्ष असतील ( Nana Patole will be next Congress’ state president ).

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आता नवे विधानसभा अध्यक्ष कोण असतील याची चर्चा सूरू झाली आहे. याबाबत काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानुसार विधानसभाध्यक्षपद शिवसेनेकडे दिले जाईल. त्या बदल्यात सरकारमध्ये आणखी एक उपमुख्यमंत्रीपद तयार केले जाईल. या पदावर बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले ( Balasaheb Thorat can be appointed as Deputy Chief Minister ).

तुषार खरात

Share
Published by
तुषार खरात

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago