राजकीय

राणे, कपिल पाटील दिल्लीत मोदींच्या निवासस्थानी दाखल; दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे निश्चित

टीम लय भारी

मुंबई :- खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळणार याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. आता या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या सोबत खासदार कपिल पाटील यांनाही केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आज सकाळी नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे (Narayan Rane and Kapil Patil have visited Prime Minister Modi residence).

नारायण राणे आणि कपिल पाटील दोघे कधीही महाराष्ट्रात कोणत्याही मुद्द्यांवर एकत्र आले नाहीत. मात्र, आज दोघेही मोदींच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हे दोन्ही नेते मोदींच्या निवासस्थानी आल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे (The two leaders are rumored to have arrived at Modi residence in Delhi political circles).

अजित पवार दाखवतात तिखट, पण स्थिती बिकट; निलेश राणे

ईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावाई अटकेत

आज संध्याकाळीच मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आज सकाळी राणे आणि पाटील यांनी 11 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 7 रेसकोर्सवर पोहोचले. यावेळी जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. यावेळी मोदींनी या दोन्ही नेत्यांचं स्वागत केलं. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर राणे आणि पाटील यांनी मोदींचे आभार मानले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भागवत कराड आणि हिना गावित यांनीही मोदींची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेक संकेत मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नारायण राणे आणि कपिल पाटील

दिलीपकुमार यांची वयाच्या 98 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

Cabinet expansion: Speculation rife over Jyotiraditya Scindia, Narayan Rane and Sarbananda Sonowal’s possible induction

खासदार नारायण राणे यांना काल अचानक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आला. फोन येताच राणे थेट दिल्लीला रवाना झाले. दुसरीकडे खासदार भागवत कराड आणि कपिल पाटील यांची पावले सुद्धा दिल्लीकडे रवाना झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील या तिन्ही नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित होण्याच्या चर्चांनी जोर धरला होता (Discussions were on to secure the place of these three leaders from Maharashtra in the Union Cabinet).

Rasika Jadhav

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

13 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago