Categories: राजकीय

नारायण राणे म्हणतात; यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार हे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्राला यशस्वी मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार व अन्य सगळेच मुख्यमंत्री कष्टाळू होते. परंतु विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये क्षमता नाही. त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होईल, असा आरोप भाजपचे नेते व खासदार नारायण राणे यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे हयात असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होता आले नसते. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांनी बाळासाहेबांच्या विचारांसी बेईमानी केली. महाविकास आघाडी आकारास येत असताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत हे तिघेजण शरद पवारांना जाऊन भेटले. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव तुम्ही जाहीर करा. तसे केले तर तुम्ही म्हणाल ते ऐकू, अशी या तिघांनी शरद पवारांना गळ घातली. त्यामुळे पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर केल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचीही फसवणूक केल्याचा राणे यांनी आरोप केला.

उद्धव ठाकरे यांच्यात क्षमत नाही. महाराष्ट्रासाठी धमक असलेला मुख्यमंत्री आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार नाही.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ७८ हजार कोटींची गरज : नारायण राणेंनी सांगितला खर्चाचा आकडा

बलात्कारप्रकरणी माजी भाजप आमदारास जन्मठेप

काँग्रेस रस्त्यावर उतरणार, प्रियांका गांधींचे निर्देश

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago