राजकीय

नारायण राणेंच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाईचे आदेश

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. तर दुसरीकडे मुंबई पालिकेनंही नारायण राणे यांच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाई करण्याचा चंग बांधला आहे(Narayan Rane’s unauthorized bungalow, Action order on it).

राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. या तक्रारीनंतर बंगल्याची तपासणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अंधेरी जुहू येथील तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू परिसरातील बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या शक्यतेमुळे सोमवारी मुंबई पालिकेच्या पथकाकडून तपासणी होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी बंगल्यात राणे कुटुंबीयांतील कुणीही उपलब्ध नसल्याने अधिकारी तपासणीविनाच परतले होते. या प्रकरणामुळे शिवसेना व राणे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगल्याच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

विनायक राऊतांचा राणेंवर प्रतिहल्ला, लाचारी पत्करणे नारायण राणेंकडून शिकावे

ये पब्लिक सब जानती है; छगन भुजबळांचा नारायण राणेंना टोला

मिलिंद नार्वेकरांच्या नारायण राणेंना कानपिचक्या!

Tit-for-tat? Shiv Sena to meet Maharashtra Home Minister for reopening of ‘murder cases’ against Narayan Rane

आरटीआय कार्यकर्ते संतोष जोंधकर यांनी राणे यांच्या जुहूमधील बंगल्याचे बांधकाम नियमबाह्य पद्धतीने केल्याची तक्रार केली आहे. आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली.

मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत सेक्शन ४८८ नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली. के-वेस्ट वॉर्ड आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक जुहू तारा रोडवरील अधीश बंगल्यावर येऊन तपासणी आणि बेकायदा बांधकामाबाबत मिळालेल्या तक्रारीची खात्री करून घेणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago