राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिकमध्ये स्वागत होताच आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केला पाठिंबा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी वंदे भारत एक्सप्रेसमधून त्यांनी प्रवास केला. नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकावर येताच अजित पवार गटांकडून त्यांचे ढोल ताशाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी केली होती.

अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षात फूट पडली. यानंतर राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला. पण काही आमदार नक्की कोणाच्या बाजूने आहेत ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली नव्हती. आज अजित पवार नाशिकमध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते नाशिकमध्ये आले असताना नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवारांच्या स्वागताला उपस्थित राहून त्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

हे सुद्धा वाचा:

अभिनेता रवींद्र महाजनी यांचा राहत्या घरी आढळला मृतदेह

भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांना मंत्रीपदाची हुलकावणी

अजित पवार यांची फाइल दोन चाळणीतून जाणार; निधी वाटपात समानतेसाठी हे नियोजन

आमदार सरोज अहिरे यांनी पक्ष फूटीनंतर त्यांचा पाठिंबा कोणाला हे स्पष्ट केले नव्हते. पण आज त्यांनी अजित पवारांचे स्वागत करत त्यांना पाठिंबा जाहीर केला. मतदार संघातील विकास खुंटला आहे. विकास काम सुरू होण्यासाठी आणि थांबलेली विकास कामे होण्यासाठी सत्तेत राहणे महत्वाचे आहे म्हणून अजित पवार यांना पाठिंबा देत आहे असे सरोज अहिरे म्हणाल्या. यावेळी शरद पवार हे माझ्या वाडिलांसारखे आहेत त्यांच्या बरोबर माझ भावनिक नात आहे. त्यांना मी नेहमी भेटून त्यांचे मार्गदर्शन घेत राहील असे त्यांनी सांगितले.

मोनाली निचिते

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

11 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

13 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

15 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

15 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

16 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

16 hours ago