राजकीय

भाजप समर्थकांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला?, मंत्री नवाब मलिकांचा भाजपला सवाल

टीम लय भारी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये हलगर्जीपणा झाला. मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाला आहे. पंजाब सरकार आणि राज्यातील पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी असताना असा हलगर्जीपणा कसा झाला? असा प्रश्न निर्मण झाला आहे. मोदींचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला होता त्याचे व्हिडीओ आणि फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत(Nawab Malik’s question to BJP about Modi’s security breach).

यामध्ये आता आणखी एक व्हिडीओ अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पोस्ट करत भाजपवर पलटवार केला आहे. मोदींच्या ताफ्याजवळ भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक कसे पोहोचले असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे.

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे मुख्य कारण आले समोर

ओबीसी आरक्षणावरून नवाब मलिक यांचा इशारा!

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पंजाबमध्ये सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा आहे. मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका उड्डाणपुलावर रोखला होता. ताफा जाणूनबुजून रोखण्यात आला असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र नावब मलिक यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये भाजपचेही समर्थक तिथे घोषणाबाजी करताना दिसत आहेत. मोदींच्या ताफ्याजवळ भाजप समर्थक असल्यामुळे विरोधकांकडून आता भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे.

मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले : नाना पटोले

FPJ Legal | PM Modi’s security breach: SC orders registrar general of Punjab and Haryana HC to secure, preserve travel records

नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर टीकास्त्र डागलं आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला आहे. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago