राजकीय

आपले विमान हवेतच जास्त असायचे; रोहित पवार यांची प्रफुल पटेलांवर जळजळीत टीका

अजित पवारांच्या बंडानंतर काल शरद पवार आणि अजित पवार गट यांच्या मुंबईमध्ये बैठका पार पडल्या. या बैठकामध्ये दोन्ही बाजूनी एकमेकांवर वारपलटवार करण्यात आले. यामध्ये अजित पवार गटातील प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. आता प्रफुल पटेल यांच्यावर रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘तुम्हाला साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही’ अशी टीका रोहित पवार यांनी प्रफुल पटेल यांच्यावर केली आहे.

राष्ट्रवादीच्या फूटीनंतर रोहित पवार रोज अजित पवार गटावर निशाण साधत आहेत. आज देखील रोहित पवार यांनी ट्विट करत प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली आहे. ‘प्रफुल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली… जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं.. म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही…’ अशी जळजळीत टीका रोहित पवार यांनी पटेलांवर केली आहे.

बुधवारी (काल) झालेल्या सभेत प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांना, अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही चूक होती तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सत्तेत का बसवले? त्यांना विरोधी पक्षनेते पद का दिलं ? असा सवाल केला होता. तसेच मी पुस्तके लिहिली तर मोठा भूकंप होईल असा देखील पटेल म्हणाले होते.

प्रफुल पटेल यांच्या याच विधानावर रोहित पवार यांनी ट्वीट करत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये प्रफुल पटेल यांच्या वडिलांच्या निधनानंतर शरद पवार यांनी आपल्यावर दाखवलेल प्रेम आणि माया सर्वश्रृत आहे. पवार साहेबांचा सखा सोबती म्हणून आपली राजकारणात ओळख होती. पण अस काय झाल की आपल्याला मोठ करणाऱ्या गुरूला आपण फसवल ? असा सवाल रोहित पवार यांनी पटेलाना विचारलं आहे. तसेच शरद पवारांसोबत असताना पटेलांच्या राजकीय प्रवास कसा होता पटेलांकडे 1985 पासून ते 2023 पर्यंत किती पदे देण्यात आली याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. आणि हे सगळं वाचल्यावर लोक म्हणतील की, असा अन्याय आमच्यावर पण व्हायला पाहिजे असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधून रोहित पवार यांनी पटेलांवर कडाडून टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा:

अखेर ठरलं! चांद्रयान-3 या दिवशी लॉंच होण्याची शक्यता

ठाकरे बंधु एकत्र येणार का? मनसेचे अभिजीत पानसे राऊतांच्या भेटीला

पाच महिन्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आले अच्छे दिन; मिळाला समाधानकारक भाव

मोनाली निचिते

Recent Posts

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

6 mins ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

43 mins ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

2 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

2 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

2 hours ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago