राजकीय

पवारसाब और दादाने जिल्हा बँकमें राजे लोगों को एकही मारा लेकिन सॉलिड मारा

टीम लय भारी

फलटण, दि. 6 डिसेंबर  (विशेष प्रतिनिधी)

जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवारसाब, अजितदादा आणि राष्ट्रवादीला किरकोळीत घेणाऱ्या आणि सातारा जिल्ह्यातील अख्खा पक्षच मोडायला निघालेल्या राजेगटाला जिल्हा बँकेत ‘पवारसाब और अजितदादाने मिलकर एकही मारा लेकीन सॉलिड मारा’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हयात घालविलेल्या ज्येष्ठ नेते किंवा कार्यकर्त्याने लई भारीशी बोलताना व्यक्त केली(NCP: Strong criticism on Ajit Pawar)

ते कार्यकर्ते फोनवर बोलताना म्हणाले ते असे, “विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी पक्ष गाडायला निघालेले आहेत. अगोदर आपल्या जावयाला त्यांनी भाजपामध्ये पाठविले. मग त्यांनी शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे यांना भाजपमध्ये धाडले. जिल्हा बँक पूर्ण ताब्यात रहावी म्हणून भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याशी गुप्त आघाडी केली.

Ajit Pawar : अजित पवारांची मोठी घोषणा ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार

Ajit Pawar : BMC मध्ये महाविकास एकत्र लढणार ? की…, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

स्वतः सह अकरा जागा बिनविरोध निवडून आणल्या. राष्ट्रवादीच्या चार जागा पाडल्या”. अजितदादा पवार यांनी उमेदवारी नक्की केलेले नंदू मोरे यांना पाडण्यासाठी प्रभाकर घार्गे यांना तुरुंगातून निवडणूक लढायला लावून मोरे यांना पाडले. अजित पवार यांनी उमेदवारी नक्की केलेल्या शिवाजी महाडिक यांना आमदार महेश शिंदे यांच्याकडून तर शशिकांत शिंदे यांना शिवेंद्रसिंहराजे यांच्याकरवी पाडले. माणची जागा पण पाडली.

विधानसभेला प्रभाकर देशमुख आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव करून राष्ट्रवादीशी गद्दारी केली होतीच. तसेच पहाटेच्या शपथविधीच्या वेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांना अज्ञातस्थळी ठेवले होते. बँकेची निवडणूक झाल्यावर शिवेंद्रसिंहराजे यांना जाहीरपणे अध्यक्षपद मागायला लावून सातारा जिल्हा बँक फडणवीस आणि अमित शहाच्या चरणी वाहायला रामराजे  निघाले होते.

Ajit Pawar : जिल्हा नियोजन विकास निधीत कपात नाही 

Centre should be strict with international passengers: Ajit Pawar

पण पवार चुलत्या पुतण्यांनी राष्ट्रवादी आणि कुटुंबाशी एकनिष्ठ अशा माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांच्या कुटुंबातील नितीन पाटील यांना अध्यक्ष करून तीन राजांना एकच मारली पण सॉलिड मारली. ही एकच मारताना राजेमंडळीच्या गेल्या चार वर्षातील गद्दारीची आठवण करून दिली. यात महत्वाचे म्हणजे फलटणमध्ये पवारसाहेब यांच्या सभेत गोंधळ घालण्यामागे कोण होते? पवारसाहेब यांनी माढा मतदारसंघातुन माघार कुणामुळे घ्यावी लागली, हे अधोरेखित केले.

पवारसाहेब यांच्या दणक्याने राजांच्या समोर दिवसा चांदण्या चमकल्या आहेत. हे करताना साहेबांनी पालकमंत्री, खासदार, आजी आणि माजी आमदार यांनाही कुणकुण लागू दिली नव्हती. असे हे ज्येष्ठ कार्यकर्ते लई भारीशी बोलताना म्हणाले.

टीम लय भारी

Share
Published by
टीम लय भारी

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

21 mins ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

1 hour ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

2 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

3 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

17 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

19 hours ago