राजकीय

‘हे खपवून घेणार नाही’, निलेश लंकेंचा थेट पडळकरांना इशारा

टीम लय भारी

मुंबई :- सोलापूरातील पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर जाहीर टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी नेत्यांनी पडळकरांवर हल्लाबोल केला आहे. यापुढे तुमचे बोलणे खपवून घेणार नाही असा इशारा गोपीचंद पडळकरांना आमदार निलेश लंकेंनी दिला आहे (MLA Nilesh Lanka has warned Gopichand Padalkar that he will not tolerate your talk).

गोपीचंद पडळकरांनी काल सोलापूर पत्रकार परिषदेत पवारांवर जाहीर टीका केली. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी पडळकरांची खबर घेत ते म्हणाले, शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणे शंभर टक्के चुकीचे आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अश्याप्रकारे वक्तव्य करणे हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही असे निलेश लंके म्हणाले आहेत.

दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, आरोपीसोबत रोहित पवारांचा फोटो शेर…

१ जुलैपासून ‘या’ गोष्टी बदलणार…

पत्रकार परिषदेत पडळकरांनी,  ‘रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला होता. पवार हे मोठे नेते आहेत मी मानत नाही, तुम्ही ते मनात असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. त्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीची खिल्ली उडवली. शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. पवारांच्या पंतप्रधानपदावर प्रश्न चिन्ह केले असे एकापाठोपाठ एक शाब्दिक वार पवारांवर केले. शरद पवारांवर केलेल्या जाहीर टिकेनंतर राष्ट्रवादी नेते गोपीचंद पडळकरांवर तुटन पडले आहेत. इथून पुढे असे वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा निलेश लंकेंनी दिला आहे (Nilesh Lanka has warned that he will not tolerate such statements from now on).

निलेश लंके आणि गोपीचंद पडळकर

काल रात्री आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला इशारा देतांना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असे म्हणत पडळकर म्हणाले आहेत. दगडफेकीनंतर आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला धारेवर धरले आहे.

नशिबाने उपजिल्हाधिकारी झाले, पण दुर्दैवाने घरी गेले

Maharashtra BJP Leader Says His Car Was Attacked With Stone In Solapur

यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले, माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझे शरद पवारांना आव्हान आहे की, त्यांनी सांगावे, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचे हे कोणत्या कलमात लिहले आहे असा प्रश्न पडळकरांनी केला आहे (Padalkar has asked in which section it is written to put a stone on the head)

Rasika Jadhav

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

59 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

4 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

6 hours ago