राजकीय

संतोष परब हल्ला प्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणेची सुप्रीम कोर्टात धाव

टीम लय भारी
मुंबई:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसैनिक अनिल परब यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. 24 जानेवारी कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांची चौकशी केली आहे.(Nitesh Rane runs to Supreme Court to avoid arrest)

नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर आता नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

शिवथाळी सुरू कारण ती शिवसेना कार्यकर्त्यांची मग इतराचे काय? निलेश राणेंचा प्रश्न

Maharashtra BJP MLA, Nitesh Rane moves Supreme Court for pre-arrest bail in an attempt to murder case

सोमवारी कणकवली पोलिसांनी नितेश राणेंची सुमारे तासभर चौकशी केली. यावेळी नितेश राणे यांच्या सोबत त्यांचे वकील संग्राम देसाई देखील उपस्थित होते. पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलीसांकडून त्यांची सुमारे पाऊण तास चौकशी करण्यात आली; मात्र, या चौकशीचा तपशील देण्यास पोलिस प्रशासनाकडून नकार देण्यात आला.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन नाकारण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली असून 27 जानेवारीला सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांच्यावतीने आता मुकूल रोहतगी युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे नितेश राणेंना सुप्रीम कोर्टात तरी दिलासा मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले. मुकूल यांनी  राजकीय आकसातून दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्याप्रकारानी तातडीने सुनावणी घेतली जावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डिसेंबरमध्ये ही घटना घडली. कणकवली येथील शिवसैनिक संतोष परब यांनी राणे यांच्याशी संबंधित व्यक्तींनी मारहाण केल्याचा दावा करणारी तक्रार दाखल केल्यानंतर राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. 27 जानेवारीलाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Pratikesh Patil

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago