राजकीय

Nitin Gadkari : शेतकरी आंदोलनावरुन केंद्रीय मंत्री गडकरी यांचे मोठ विधान, म्हणाले…

टिम लय भारी

मुंबई : कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या वेशीवर गेल्या 20 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union road transport and highways minister Nitin Gadkari) यांनी आमचे सरकार शेतक-याना कृषी कायदे योग्य असल्याचे पटवून देईल, समजावून सांगेल आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गडकरी यांनी एएनआयला मुलाखत दिली असून यावेळी त्यांनी जर आपल्याला सांगितले तर शेतक-यासोबत चर्चा करु असेही म्हटले आहे.

सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतक-यासोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितल तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन, असे ते म्हणाले. जर चर्चाच नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. जर चर्चा असेल तर तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतक-याना न्याय आणि दिलासाही मिळेल. शेतक-याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. नवे कृषी कायदे आणून सरकारने शेतक-याविरोधात काही केलेले नाही, असे सांगताना गडकरी यांनी सरकार शेतक-याचे म्हणणं ऐकून घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.

मी विदर्भातला आहे, तिथे 10 हजार गरीब शेतक-यानी आत्महत्या केल्या आहेत. या मुद्द्याचे राजकारण करता कामा नये. शेतकरी, शेतकरी संघटनांकडून ज्या सुधारणा सांगितल्या जात आहेत त्या योग्य असतील तर बदल करण्यास हरकत नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

गडकरी यांनी यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोनलावरही भाष्य केले आहे. “मला वाटत नाही अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील. आम्ही शेतक-याच्या विरोधात काही केलेले नाही. आपलं धान्य मंडी, व्यापारी किंवा अन्य कुठेही विकणे हा शेतक-याचा अधिकार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago