राजकीय

Nitish Kumar : खरा मित्र कोण हे उशीरा समजले- नितीशकुमार

टीम लय भारी

पटना : विधानसभा निवडणुकीत माझी आणि माझ्या पक्षाची अगदी ठरवून आणि पद्धतशीर बदनामी करण्यात आली. त्यामुळे खरा मित्र कोण आणि कोण खोटा हे समजले होते . पण त्यावेळी खूप उशीर झाला होता असे उद्विग्न पणे सांगून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी मित्रपक्ष आणि सत्तेत भागीदार असलेल्या भारतीय जनता पार्टी च्या संपूर्ण वर्तनावर पहिल्यांदा अप्रत्यक्षपणे तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने नितिषबाबू यांच्या संयुक्त जनता दलालासोबत युती करून निवडणूक लढवली. पण हे करताना दुसरीकडे एनडीए मध्ये समाविष्ट असलेल्या चिराग पासवान यांच्या लोकजन शक्ती या पक्षाला स्वतंत्र पणे निवडणूक लढविण्यास सांगितले. आणि या पक्षातील उमेदवारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपने जेडीयु चे अनेक प्रबळ उमेदवार गारद केले. विशेष म्हणजे पासवान यांच्या पक्षातर्फे जे उमेदवार निवडणूक लढवत होते ते बहुतांश संघाशी निगडित होते. यामुळे नितीशकुमार यांच्या पक्षाला केवळ 43 जागा मिळाल्या तर भाजपने 72 जागांवर विजय मिळविला होता. हा धागा पकडून नितीशकुमार यांनी आज आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

खरा मित्र कोण आणि कोण धोकेबाज हे आम्हाला समजले पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता असे सांगून नितीशकुमार म्हणाले, निवडणूक प्रचारात माझी आणि पक्षाची ठरवून बदनामी करण्यात येत होती. सुरुवातीला लक्षात येत नव्हते की हे नेमके काय चालले आहे, पण ज्यावेळी समजले तो पर्यंत खूप उशीर झाला होता असे सांगून नितीशकुमार यांनी भाजपला अप्रत्यक्ष दोषी धरले आहे.

निवडणुकीत कोणी किती जागा लढवायच्या याबाबत सुद्धा झालेल्या जागा वाटपातील उशीर मोठी किंमत देऊन गेला अशी तीव्र नाराजी व्यक्त करून नितीशकुमार म्हणाले , यामध्येच पक्षाचो मोठी हानी झाली होती. निवडणूक निकालानंतर मला अजिबात मुख्यमंत्री व्हायचे नव्हते पण पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्या प्रचंड आग्रहामुळे नाईलाजाने मला हे पद स्वीकारावे लागले, अशी कबुली नितीशकुमार यांनी दिली आहे.

दरम्यान नितीशकुमार यांच्या या वक्तव्यामुळे येत्या काही दिवसात बिहार च्या राजकारणात मोठे बदल होतील असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.

अतुल माने
ज्येष्ठ पत्रकार

अभिषेक सावंत

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

4 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

4 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

5 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

8 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

9 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

9 hours ago