राजकीय

आकाशातून नाही तर जमिनीवरून पाहणी करणार, मुख्यमंत्र्याचा मोदींना टोला

टीम लय भारी

मुंबई :- तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर कुठे किती आणि कशी मदत करायची हे जाहीर करु,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. तसेच “मी आकाशातू नाही, तर जमिनीवरुन पाहणी करणार,” असा खोचक टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला (Chief Minister Uddhav Thackeray also lashed out at Prime Minister Narendra Modi, saying, “I am not from the sky, but from the ground).

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा 

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देत आहेत. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावा घेत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी संतापल्या

मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? त्यांचा इतर राज्यांशी संबंध नाही का? : पृथ्वीराज चव्हाण

Triage is a global weapon in Covid-19 battle – but social disparities blunt its edge in India

येत्या दोन तीन दिवसात पंचनामे करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे काही वेळापूर्वी रत्नागिरीत दाखल झाले. मुंबईहून रत्नागिरी येथे पोहचल्यावर प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला. येत्या दोन ते तीन दिवसात पंचनामे पूर्ण होतील. यानंतर कुठे, किती आणि कशी मदत जाहीर करायची हे जाहीर करु. मदतीविना कोणीही वंचित राहणार नाही. नुकसान झालेल्या शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे आदेश उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिले.

दौरा चार तासांचा असला तरी मी फोटोसेशनसाठी आलेलो नाही

मुख्यमंत्री (Chief Minister) चार तासांचा दौरा करुन जाणार अशी टीका विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कोकण दौऱ्यावर केली होती. यानंतर मी विरोधकांना उत्तर द्यायला आलेलो नाही, मी कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन गेलो नाही. जमिनीवर उतरलो आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लगावला. तसेच दौरा जरी चार तासांचा असला तरी मी फोटोसेशनसाठी आलेलो नाही. मी उत्तम नसलो तरी फोटोग्राफर आहे, असेही ते म्हणाले.

मदत वाढवण्याची गरज

वादळग्रस्तांसाठी जे निकष आहेत ते बदलण्याची तसेच मदत वाढवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही. तातडीन नुकसानग्रस्तांना मदत करणे भाग आहे. बदलत्या हवामानामुळे वादळ धडकतायत, वीज पुरवठा खंडीत न होणे यांसह विविध बाबींवर काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार

ज्यांचे नुकसान झाल आहे त्यांना आम्ही नाराज करणार नाही. त्यांच्यासोबत सरकार आहे. जे काही देणे शक्य आहे, त्यांना ते ते देऊ. कोकणात प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार असे ही मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

5 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

5 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago