राजकीय

पंकजाताईंनी नवी जबाबदारी मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंची काढली आठवण

टीम लय भारी

मुंबई : भाजपकडून पंकजा मुंडे यांना सतत डावलले जात होते. पण आता केंद्रीय कार्यकारिणीमध्ये पंकजाताईंना स्थान मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजाताईंनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली आहे ( Pankaja Munde remembered to Gopinath Munde )

पंकजाताईंनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतचे एक छायाचित्र ट्विट केले आहे. ‘सदैव तुमचा आशिर्वाद… कधीही व्यर्थ गेली नाही माझी साद…’ अशा भावना पंकजाताईंनी या छायाचित्रासोबत व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्रात भाजपला तळागाळात रुजविण्यामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे ( Gopinath Munde was popular leader in Maharashtra ). त्यामुळे राज्यात गोपीनाथ मुंडे यांची अफाट लोकप्रियता आहे. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजाताईंची लोकांमध्ये क्रेझ आहे.

देवेंद्र फडणविसांकडून पंकजाताईंचे खच्चीकरण

पंकजाताई लोकप्रिय नेत्या असल्या तरी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सतत डावलले. मागील सरकारमध्ये पंकजाताईंकडील जलसंधारण खाते काढून घेण्यात आले होते. पंकजाताई परदेशात असतानाच, त्यांना कोणतीही कल्पना न देता फडणवीस यांनी ‘गेम’ केला होता. त्यावर पंकजाताईंनी जाहीररित्या ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती ( Devendra Fadnavis sidelined to Pankaja Munde ).

हे सुद्धा वाचा

संजय राऊत म्हणाले, भाजपचे नेतेही शरद पवारांना भेटतात

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेसोबत युती नाही

नरेंद्र मोदींनी डावललेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजाताईंचे चुलत बंधून धनंजय मुंडे यांचा या निवडणुकीत विजय झाला. या निवडणुकीसाठी पक्षाने सहकार्य केले नव्हते अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती ( Pankaja Munde lost assembly election against Dhananjay Munde ).

या पराभवानंतर पंकजाताई कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर विधानपरिषदेवर त्यांना संधी दिली जाईल असे बोलले जात होते. परंतु पंकजा मुंडेंना तिथेही ऐनवेळी डावलले. एवढेच नव्हे, तर नवख्या व सुमार उमेदवारांना तिथे संधी दिली.

मध्यंतरी भाजपने महाराष्ट्राची कार्यकारिणी घोषित केली. या कार्यकारिणीमधून पंकजाताईंना काढून टाकण्यात आले. त्या ऐवजी त्यांची बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आली.

पंकजाताईंना वारंवार डावलल्यानंतर आता त्यांची राष्ट्रीय सचिव पदावर नियुक्ती केली आहे ( Pankaja Munde appointed as a National Secretary in BJP ). या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढतानाच नरेंद्र मोदी, अमित शाह व जे. पी. नड्डा यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा
तुषार खरात

Recent Posts

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

41 mins ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

21 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

22 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

22 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

23 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

1 day ago