राजकीय

पेट्रोल-डिझेलची भाववाढ मागे घ्या नाहीतर मोठे आंदोलन करु, पटोलेंचा इशारा

टीम लय भारी

मुंबई :-  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारात इंधनाच्या दरावरही परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल-डिझेलची भाववाढ मागे घ्या नाहीतर मोठे आंदोलन करु, पटोले यांनी इशारा दिला आहे (“Take back the petrol-diesel price hike or we will start a big agitation,” Patole warned).

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पेट्रोल डिझेलवर (Petrol-Diesel) भरमसाठ कर लादून जनतेचे खिसे कापत आहे. या अन्यायी जुलमी, अत्याचारी दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आज राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला आहे. मोदी सरकारने ही जुलमी करवसुली कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्ष यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला (Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole gave).

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस सतर्कतेचा इशारा

एक्साईजच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाणांची केंद्र सरकारला बोचरी टीका

After Petrol, Diesel Nears ₹ 100 Mark In Rajasthan

पेट्रोल पंपावर इंधन आणि गॅस दरवाढीविरोधातील आंदोलनात सहभाग

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील पेट्रोल पंपावर इंधन आणि गॅस दरवाढीविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, अभिजीत वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, राजा तिडके, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी आदी उपस्थित होते.

कोरोनाने दीड वर्षापासून लोकांचे उत्पन्न कमी झाले

वडसा येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, कोरोनाने दीड वर्षापासून लोकांचे उत्पन्न कमी झाले, उद्योग धंदे बंद आहेत, लाखो लोकांचे रोजगार गेले, कठीण परिस्थितीत लोक जगत असताना त्यात इंधन दरवाढ आणि महागाईने लोकांचे जगणे मुश्कील झाले. यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांनी इंधनाच्या महागाईची झळ लोकांना बसू नये म्हणून दर स्थिर ठेवून जनतेला दिलासा होता, परंतु मोदी सरकार मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव कमी असतानाही भरमसाठ कर रूपाने लोकांच्या खिशावर दरोडे टाकून नफेखोरी करत आहे.

प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

राज्यव्यापी आंदोलनात ठाणे येथे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत शिंदे, रवींद्र आंग्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील 35 पेट्रोल पंपांसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कसबा विधानसभा मतदारसंघातील कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक, सांगली, अहमदनगर, नांदेड, मालवण, अमरावती, सावंतवाडी, कणकवली, बुलढाणा, नांदेड, औरंगाबाद यासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. राज्यातील एक हजार पेट्रोल पंपांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकाचवेळी आंदोलन करून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध केला. यावेळी मोदी सरकार जुलमी दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Rasika Jadhav

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

12 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

12 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

13 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

13 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

14 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

16 hours ago