राजकीय

राजकारणातील विश्वासू आणि निष्ठावान सहकाऱ्याच्या निधनाने पवार हळहळले

टीम लय भारी

मुंबई :-  राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलिक (Haji Gaffar Malik) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावली. या वृत्ताने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला आहे. राजकारणातील विश्वासू आणि निष्ठावान सहकाऱ्याच्या निधनाने पवार हळहळले (Pawar was shocked by the death of his loyal and loyal colleague in politics).

जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक (Haji Gaffar Malik) यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. या वृत्ताने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हाजी गफ्फार मलिक (Haji Gaffar Malik) यांच्या दुःखद निधनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. त्यांच्या मृत्यूबाबत सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

कोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत रोहित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स ! त्यांच्या डान्सने वातावरण झाले हलकंफुलकं

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

Chennai: Teacher accused of sexually harassing students arrested, booked under POCSO Act

रावेर विधानसभा निवडणूक लढवली

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवास आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरुन रावेर विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या काही मतांच्या फरकामुळे त्यांचा पराभव झाला होता.

पडत्या काळात राष्ट्रवादीला साथ

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अग्रेसर राहण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असून पक्षवाढी करीता त्यांनी परिश्रम घेतले होते. राष्ट्रवादीचे
सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षात ख्याती होती. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात मलिक यांना अनेक पक्षातून बोलावणे आले होते. मात्र त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीसोबत निष्ठा राखली.

शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्य प्रमुख डॉ. हाजी अब्दुल गफ्फार मलिक (Haji Gaffar Malik) यांचे निधन दुःखदायक आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन आणि इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्च शिक्षणासाठी आणि औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले. राजकीय क्षेत्रातील संयत तरीही आग्रही नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना आणि भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

36 seconds ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

22 mins ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

34 mins ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

49 mins ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

1 hour ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

14 hours ago