राजकीय

पंतप्रधानांना सभेची जागा बदलावी लागली : रोहित पवारांचा आरोप

राज्यात यापूर्वी जे टप्पे झाले त्यामधे मतदान कमी झाल्याचे दिसते कारण भाजपचे मतदार बाहेर पडत नाही.कारण 10 वर्षात काहीच विकास झाला नाही. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप मतदारांना घाबरले आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जागा बदलावी लागली असा आरोप देखील आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. ते नाशिक मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मतदारांना फोडाफोडी आवडलेली नाही, भाजपचे मतदार जे भाजपलाच मतदान करता, ते बाहेर आले नाहीत, कमी मतदानाची काळजी आम्हाला आहे, लोकांचा विश्वास उडाला आहे असे दिसते असे सांगितले.(PM had to change venue of rally: Rohit Pawar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात सभा घेत आहेत मात्र ते शेतकऱ्यांना घाबरले आहेत असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठा प्रमाणात पैश्याच्या वापर झाला आहे . नाशिक मध्ये मविआ विरोधात धनाढ्य शक्ती आहे, पैश्याचा वापर सुरू आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला. दोन तासासाठी मुख्यमंत्री नाशिक मध्ये आले . त्यांचे जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये नऊ बागा पोलीस कर्मचारी हेलिकॉप्टर मधून उतरवताना दिसत आहेत जे मुख्यमंत्री फाईल सुद्धा हातात घेता येत नाही, तेव्हा 9 बॅगा कशासाठी आणल्या गेल्या असा टोला रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

रोहित पवार  यांनी Y सिक्युरिटी , z सिक्युरिटी असलेल्या गाड्यांमध्ये पैसे वाटले गेले. महायुती तर्फे 2000 कोटी रुपये निवडणुकीत वापरले गेले आणि वापरणार असून बारामतीत 150 कोटी रु विरोधानकडून वापरले गेले असा थेट आरोप केला. सुजय विखेना दोन तासासाठी 9 बॅगा लागत असतील, तर ते मोठे आहेत, इंग्लिश ही ते बोलतात असा टोला रोहित पवार यांनी लगावला. दुसऱ्या फेज नंतर काही ठिकाणी 5 – 5.5 टक्के मतदान वाढले ह्यावर त्या त्या ठिकाणी अर्ज केलेत, आपली लढत मोठ्या धनाढ शक्तीशी असल्याने आपल्याला खूप सावध राहावे लागेल असे पवार म्हणाले. पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्ही मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही साठी 2-3 दिवस पाठपुरावा केल्यावर आम्हाला त्याचा acess मिळाला.ह्याबाबत पत्र दिले आहे मात्र तिथे गोदाम बंद असताना एक वायरमन कशासाठी गेला होता याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.

अजितदादांच्या मित्र परिवारात 80 कोटींचा घोटाळा झाला आहे . कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांनी 200 कोटी चा दूध घोटाळा केला आहे. या सरकारने एकत्रित 25 हजार कोटीचा घोटाळा 2 ते 2.5 वर्षात केला आहे असा थेट आरोप पवार (Rohit Pawar) यांनी केला.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

18 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

19 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

19 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

7 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago