Categories: राजकीय

नव्या मंत्र्यांचे खातेवाटप उद्या किंवा परवा : उद्धव ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘महाविकास आघाडी’च्या मंत्र्यांनी आज शपथ घेतली. या नव्या मंत्र्यांकडे कोणते खाते असणार याबद्दल आता सर्वसामान्य जनतेमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर शपथ घेतलेल्या मंत्र्यांना उद्या किंवा परवा खातेवाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण २६ कॅबिनेट, तर १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनील केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख, दादा भुसे, जितेंद्र आव्हाड, संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, यशोमती ठाकूर, अनिल परब, उदय सामंत, के. सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख, आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे, तर राज्यमंत्र्यांमध्ये अब्दुल सत्तार, सतेज पाटील, शंभूराज देसाई, बच्चू कडू, विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील – येड्रावकर यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्या महिन्यात सत्तेवर आले आहे. त्यावेळी अवघ्या सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यांत स्वतः उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, जयंत पाटील व छगन भुजबळ यांचा समावेश होता. सध्या या सहा मंत्र्यांकडेच सगळ्या खात्यांचा कारभार आहे. एकेका मंत्र्यांकडे सहा ते दहा खात्यांचा कारभार सोपविण्यात आला आहे. या मंत्र्यांकडील अतिरिक्त खात्यांचे वाटप आता नव्या मंत्र्यांना केले जाईल.

अवघ्या दीड महिन्यात अजित पवारांची दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दीड महिन्यांपूर्वीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी ‘महाविकास आघाडी’ आस्तित्वात येत असतानाच बंड केले होते. भाजपसोबत घरोबा करीत अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण अवघ्या ८० तासांताच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून ते परत राष्ट्रवादीमध्ये आले होते. फडणवीस यांच्यासोबतीने स्वप्न पाहिलेले उपमुख्यमंत्रीपद या सरकारमध्येही अजितदादांना मिळाले आहे. उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची अजितदादांची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये ते दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले होते.

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

5 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

5 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago