राजकीय

औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला, ते तुम्ही पुसणार आहात का; प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल

राज्यात गेल्या काही दिवसात निर्माण झालेल्या दंगलसदृश परिस्थितीच्या मागे औरंगजेबचे उदात्तीकरण हा मुद्दा असताना, नव्हे तर कोल्हापूर दंगलीस औरंगाजेबचे स्टेटस ठेवल्याचा मुद्दा कारणीभूत ठरला होता. असे असताना आता वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबच्या कबरीला भेट दिली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांबरोबर बोलताना,’औरंगाजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का? औरंगाजेबचं राज्य का आलं, हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. जयचंद इथे आले आणि राज्या-राज्यात झाले. त्यामुळे जयचंदांना शिव्या घाला. औरंगाजेबला शिव्या कशाला घालता,’ असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेशी आघाडी करायला वंचित तयार आहे असे वातावरण असताना, या कबर भेटीनंतर शिवसेनेची कोंडी होऊ शकते का ? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना प्रसार माध्यमांनी केला असता, ‘या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही,’ असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

औरंगाजेबच्या स्टेटसमुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला आहे. याबद्दल प्रकाश आंबेडकर यांना छेडले असता, माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर, दोन दिवसांत निपटून टाकलं असतं. वादाचा विषय म्हणजे, होऊ देता म्हणून, असे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

कोस्टल रोडचे काम 76 टक्के पूर्ण; 13 हजार कोटींच्या घरात खर्च,नोव्हेंबर 2023 पर्यंत काम होणार पूर्ण

शहापूरच्या आदिवासीबहुल खोस्ते गावातील स्वधर्म फाऊंडेशनच्या सांस्कृतिक व आरोग्य केंद्राचा उद्या लोकार्पण सोहळा

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर शाईफेक करून हल्ला

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा जाणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. गोमांस, मॉबलिचिंग, विशिष्ट धर्माची प्रार्थनास्थळे यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर करण्यात आल्यापासून राज्यात कुठे ना कुठे धर्माधर्मात वाद निर्माण होण्यास क्षुल्लक कारण पुरेसे होते. अशातच आता राज्यात मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी औरंगजेब हा नवा मुद्दा पुढे करण्यात येत आहे.

 

विवेक कांबळे

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

19 mins ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

23 mins ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

29 mins ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

44 mins ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

55 mins ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

1 hour ago