राजकीय

प्रवीण दरेकरांची आघाडी सरकारवर घणाघात टीका; सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी

टीम लय भारी

मुंबई :- महाविकास आघाडी पक्षांमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेस सध्या स्वबळावर लढण्याचा नारा देत आहे. यावरून दरेकर म्हणाले, सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालणारे महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष स्वबळाची भाषा करत आहे. परंतु जनता त्यांना ‘पळ’ काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही. सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी आहे. अशी घणाघात टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे (Praveen Darekar has sharply criticized the Mahavikas Aghadi government).

काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळाचे पडले आहे. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हातात ताकद राहिलेली नाही, सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्या बाहुत बळ राहिले नाही. आज राज्यातील कामगार देशोधडीला लागलाय. त्या कामगारांच्या हातात बळ राहिलेले नाही. बेरोजारांना रोजगार मिळत नाही, पण अशा वेळी सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी आहे, अशी टीका दरेकरांनी आघाडी सरकारला लगावला आहे (The ruling parties are only concerned about their own strength, said Darekar).

शरद पवार आणि कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीनंतर; प्रविण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांचा कॉंग्रेसला सवाल, खरंच तुम्ही एकट्याने निवडणुका लढणार आहात का?

प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोणावळा येथील शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी चिटणीस रमेश पाळेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच विविध वेतनवाढ करार स्वाक्षरी कार्यक्रम दरेकर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सर्वश्री विजय पाळेकर, बिंदरा गणतंत्रा, अॅड. राहुल पोळ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.

प्रवीण दरेकर

दुसऱ्या राज्यातुन येणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्राची दारे उघडी; राजेश टोपे

Mumbai Local Trains Won’t Be Opened For Lawyers Now, Can’t go Beyond Medical Advice, Says Bombay High Court

यांना फक्त सत्ता टिकवायची आहे

राज्यातील कोट्यवधी जनतेचा विकास करण्यापेक्षा महाविकास आघाडीमधील सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याची चिंता जास्त आहे. सत्ता कशी टिकून राहील याची काळजी त्यांना जास्त आहे. आधी एकमेकांना शिव्या घालायच्या व दुसऱ्या दिवशी पुन्हा एकत्र नांदायचे हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे समीकरण झाले आहे, असेही प्रवीण दरकेर यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रे़सचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील याच ठिकाणावरून स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य केले व महाविकास आघाडीतील अविश्वासाचे वातावरण व विसंवाद जनतेसमोर उघड झाला. महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. शेतकऱ्यांना वेळेत पीकविमा मिळात नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झालाय, बेरोजगार युवक कामाच्या प्रतीक्षेत आहे. तो युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे तुमच्या स्वबळाचे राज्यातील कामगार, शेतकरी, बेरोजगार यांना काही देणे-घेणे नाही. फक्त आमच्या हातात बळ कधी येणार? आमचे कुटुंब, आमचा संसार कधी बळकट होणार? याकडे महाराष्ट्राची जनता आशेने बघत आहे. पण या महाविकास आघाडी सरकारला त्याचे काही पडलेले नाही, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे (Praveen Darekar has criticized the Mahavikas Aghadi government for not having anything to do with it).

Rasika Jadhav

Recent Posts

पावसाळ्यानंतर त्वचासंबंधी या समस्या वाढू शकतात, जाणून घ्या

सप्टेंबर महिना संपत आला असून, आता पावसाळादेखील संपलाच आहे. पावसाळा संपल्यानांतर हवामानात बदल होते. या…

12 hours ago

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारतने जिंकला…

13 hours ago

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन…

14 hours ago

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर…

15 hours ago

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

15 hours ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

16 hours ago