राजकीय

राज्याच्या विधान परिषद शतकोत्तर महोत्सवाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार

देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधान परिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. “महाराष्ट्र विधान परिषद शतकोत्तर महोत्सव” येत्या ऑगस्ट ते नोव्हेंबर, २०२३ याकाळात विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. आज झालेल्या महाराष्ट्र विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. मुख्य कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने महाराष्ट्र विधान परिषद शतकोत्तर महोत्सवातील कार्यक्रमाची आखणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

१८६१ सालच्या इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार स्थापित “Council of the Governor of Bombay” ची पहिली बैठक २२ जानेवारी, १८६२ रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासकि घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये श्री. नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. नारायण चंदावरकर हे परिषदेचे पहिले नामनिर्देशित सभापती होते. रावसाहेब एच.डी. देसाई हे निवडणुकीद्वारे उप सभापतीपदी निवडून आले. अखेर १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधान परिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. कोविड – १९ महामारीमुळे यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.

 

हे सुद्धा वाचा:

मी माझ्या पक्षाचा आदेश अंतिम मानते; पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस प्रवेशाचा मुद्दा फेटाळला

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून; अधिवेशन फक्त 15 दिवसाचे

ऑगस्ट ते नोव्हेंबर, २०२३ याकाळात विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांचा परिसंवाद, वरिष्ठ सभागृहाचे महत्व या विषयावर कार्यशाळा, विधानपरिषदेत मांडण्यात आलेली महत्वाची विधेयके, ठराव, प्रस्ताव यांचे पुस्तक स्वरुपात संकलन, शतकपूर्ती कालावधीतील महत्वाच्या घटनांवर आधारित “एक दृष्टिक्षेप” या पुस्तिकेचे प्रकाशन असे विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असेही महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

 

मोनाली निचिते

Recent Posts

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

22 mins ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

37 mins ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

14 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

15 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

17 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

17 hours ago