राजकीय

पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका : ‘महाविकास आघाडी’ सरकारने राजस्थान, पंजाबचे अनुकरण करावे

टीम लय भारी

कोल्हापूर :  केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे राजस्थान व पंजाब सरकारने रद्द केले आहेत. या दोन्ही राज्यांच्या विधिमंडळांनी बहुमताने तिन्ही कायदे रद्द केले आहेत. त्यानुसार ‘महाविकास आघाडी’ सरकारने सुद्धा हे कायदे रद्द करायला हवेत, अशी भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे ( Prithviraj Chavan given suggestion to Mahavikas Aghadi Government ).

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर येथे शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी चव्हाण पत्रकारांशी बोलत होते ( Prithviraj Chavan agitated at Kolhapur ).

कृषी कायद्यांविरोधात कोल्हापूरात भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली

चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने आणलेले शेतकरी कायदे अत्यंत घातक आहेत. देशात ८६ टक्के जनता अशी आहे की, त्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. अशा शेतकऱ्यांचे नव्या कायद्यांमुळे नुकसान होणार आहे ( New farm acts are harmful for farmers which was brought by Narendra Modi Government ).

हे सुद्धा वाचा

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली महिला अत्याचाराविरोधात काँग्रेसचा चैत्यभूमीवर एल्गार

Hathras Case : संवेदनाहीन उत्तर प्रदेश सरकारचा हाथरस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात

SpeakUpForFarmers : बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर डागली तोफ, कायदे रद्द होईपर्यंत केंद्र सरकारविरोधात संघर्ष करणार

कामगार व शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस केंद्राच्या काळ्या कायद्याविरोधात संघर्ष करणार

नव्या कायद्यांमुळे शेतीचे कंत्राटीकरण होणार आहे. यात एपीएमसी बाद होईल. त्यामुळे कमी शेती असलेले शेतकरी उद्योजकांशी स्पर्धा करू शकणार नाहीत.

मोदी सत्तेवर आले त्यावेळी त्यांनी स्वामीनाथन आयोगाप्रमणे शेतमालाला भाव देण्याचे आश्वासन दिले होते. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. पण याचे पालन झाले नाही. उलट शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी धोरणे मोदी सरकारने आखली असल्याचे ते म्हणाले.

तुषार खरात

Recent Posts

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

53 mins ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 hour ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 hour ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

3 hours ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

4 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

5 hours ago