राजकीय

प्रियंका गांधींनी गाडी थांबवली अन् जखमी अपघातग्रस्त महिलेची स्वत: केली मलमपट्टी

टीम लय भारी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या जगदीशपूरमध्ये एका सफाई कामगाराचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी आग्राकडे निघाल्या होत्या. या दरम्यान, त्यांना रस्त्यावर एका मुलीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. प्रियंका गांधी यांनी आपला ताफा थांबवला आणि त्या स्वत: अपघातातील जखमी तरुणीच्या मदतीला धावल्या (Priyanka Gandhi,  showed humanity).

इतकंच नाही तर त्यांनी आपल्या गाडीतील फर्स्ट एड बॉक्स आणायला लावून स्वत: त्या तरुणीला मलमपट्टी केली. प्रियंका गांधी यांच्या या साधेपणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रियंका गांधींच्या त्या व्हायरल व्हिडीओची होणार प्रशासनाकडून चौकशी

प्रियंका गांधींना सन्मानाने तुरुंगातून सोडले नाही तर, महाराष्ट्रात काँग्रेस जेल भरो आंदोलन करणार : नाना पटोले

. प्रियंका गांधी यांनी आपला ताफा थांबवून अपघातातील जखमींना मदत केल्याचं पाहायला मिळालं

पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

त्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर त्या आज आग्राकडे जात होत्या. त्यावेळी त्यांना एका अपघाताची माहिती मिळाली. प्रियंका गांधी यांनी आपला ताफा थांबवून अपघातातील जखमींना मदत केल्याचं पाहायला मिळालं.


आग्रा इथल्या जगदीशपूर भागात पोलीस कोठडीत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी जात होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांनी यमुना एक्सप्रेस वे वर रोखलं आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. लखनौ पोलिसांनी कलम 144 आणि कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे.

संजय राऊतांनी भाजपच्या १०० भ्रष्ट व्यक्तींची नावं जाहीर करण्याचा दिला इशारा!

“Heard Yogi-Ji’s So Hurt By This Pic…”: Priyanka Gandhi On Cops’ Selfie

जगदीशपूरमध्ये सफाई कर्मचारी अरुण वाल्मिकी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करत त्यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यानंतर आज प्रियंका गांधी या मृत अरुणच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दिल्लीवरुन निघाल्या होत्या. त्यावेळी यमुना एक्सप्रेस वे च्या एन्ट्री पॉईन्टवर पोलिसांनी प्रियंका यांचा ताफा अडवला.

पोलिसांनी प्रियंका यांनी परत जाण्याचं आवाहन केलं. मात्र, प्रियंका गांधी पुढे जाण्यावर ठाम राहिल्या. त्यानंतर पोलिसांनी अखेर प्रियंका यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली.

कीर्ती घाग

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

16 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

19 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

20 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 days ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 days ago