राजकीय

राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही होऊ शकतात, देवेंद्र फडणवीसांचा टोला

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडतो आहे. तरीही सगळ्या देशाला वेध लागले आहेत ते ४ जूनचे म्हणजेच लोकसभेचा निकाल काय लागणार याचे. भाजपा आणि एनडीएने ४०० पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने इंडिया आघाडीसह आम्ही सत्तेत येऊ असं म्हटलं आहे. आज काही वेळापूर्वीच जयराम रमेश यांनी २७२ ही मॅजिक फिगर आहे ती आम्ही गाठू आणि त्यानंतर काही तासांतच आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरेल असं म्हटलं आहे. तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही आता मोदी सत्तेवर येणार नाहीत असं म्हटलं आहे. या सगळ्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे.(Rahul Gandhi can also become us president: Devendra Fadnavis)

राहुल गांधींनी काय म्हटलं होतं?
“खोट्या दाव्यांचा कारखाना असलेल्या भाजपाने स्वत:ला कितीही दिलासा दिला तरीही काही फरक पडणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात आता INDIA आघाडीचे वादळ वाहतं आहे,” असं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल लागणार आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार की जाणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधींना मुंगेरीलालची स्वप्न पाहुद्या..
राहुल गांधी म्हणतात की ४ जूनला मोदी सरकार घरी जाणार आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार, याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) म्हणाले, “मी लहान असताना मुंगेरीलाल के हसीन सपने ही सीरियल लागायची. त्यात दाखवल्याप्रमाणे मुंगेरीलाल स्वप्नं बघायचा, तशीच स्वप्नं राहुल गांधींना पाहुद्या. ते भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील अशी स्वप्नं त्यांना पडत असतील. त्यांना खुशाल स्वप्नं पाहुद्या लोकांनी मोदींना निवडलं आहे हे आम्ही पाहतो आहोत.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

3 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

4 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

5 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

5 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

6 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

6 hours ago