राजकीय

Rahul Gandhi : उद्योगपतींना कर्जमाफी ? मोदी सरकारने उद्योगपतींचे 2378760000000 रुपयांचे कर्ज माफ केले’ : राहुल गांधी

टीम लय भारी

दिल्ली : भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी असलेले अंबानी आणि अदानी यांचा आणि केंद्रातील भाजप सरकारचे लागेबंधे असल्याचा आरोप अनेक वेळा काँग्रेसकडून होत आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नेहमीच या मुद्दायवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका करत असतात. आता परत एकदा त्यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी दावा केला आहे की, यावर्षी मोदी सरकारने काही उद्योगपतींचे 2378760000000 रुपयांचे कर्म माफ केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘2378760000000 रुपयांचे कर्ज या वर्षी मोदी सरकारने काही उद्योगपतींना माफ केले आहे. या रकमेतून कोविडसारख्या संकट काळात 11 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 20-20 हजार रुपये देता आले असते. मोदीजींच्या विकासाचे हे खरे रुप आहे’, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

45 mins ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

1 hour ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

2 hours ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

2 hours ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

3 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

3 hours ago