राजकीय

मनसेच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा सूर उमटला; शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

भाजपने शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडल्याने राज्यात त्सुनामी आली आहे. 24 तासांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय भूकपानंतर राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांच्या बैठकांवर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात मनसेही मागे नाही त्याचेही राजकीय घडामोडीकडे बारकाईने लक्ष आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत सोमवारी मनसेची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया असा सूर उमटला आहे. दरम्यान, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, असे पोस्टर शिवसेना भवन समोर लागले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मनसे कार्यकर्ता लक्ष्मण पाटील याने हे पोस्टर लावले आहे.

अजित पवार यांनी भाजपशी सोयरीक साधत उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठेच भगदाड पडले आहे. या घडामोडीत आपला पक्ष पुढे कसा न्यायचा पक्षाची भूमिका काय याबाबत आज मनसेची बैठक झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे यावर चर्चा झाली. तसंच ती कशी लढायची यावर राज ठाकरेंनी नेत्यांचं मत जाणून घेतलं.

या बैठकीत उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला. याआधी 2017 च्या महापालिका असो किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका त्यावेळीही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी उघडपणे हात पुढे केला होता, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता. स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून राज ठाकरेंकडे विनंती केली की आता वेळ बरोबर आहे. मराठी माणासांची अस्मिता जपण्यासाठी ठाकरेंनी एकत्र यावं अशी जनभावना आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे यावर विचार करायला हवा, अशी विनंती करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत विचारलं असता आपण मेळाव्यात याबाबत भाष्य करु असं राज ठाकरे म्हणाले.त्यात सर्व काही स्पष्ट करेल’ असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुध्दा वाचा:

शपथविधीला उपस्थित राहणे राष्ट्रवादीच्या नेते मंडळींना महागात पडले; सर्व नेते बडतर्फ

शिर्डी, अक्कलकोटसह विविध मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रेनेचं छापेमारीचे सत्र सुरूच, एकाला अटक

या बॅनरमध्ये राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या असा मजकूर लिहण्यात आला होता. या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद मनसैनिकांनी घातली होती. मनसैनिकांनी लावलेल्या या पोस्टरवर, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत. यासोबत ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या, संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे’ असा मजकूर लिहून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचे आवाहन मनसैनिकांनी केले होते. त्यामुळे आता राजकारणात ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

रसिका येरम

Recent Posts

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

1 second ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

37 mins ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

1 hour ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

2 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

2 hours ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago