Categories: राजकीय

राज ठाकरे यांचे भाकित खरे ठरतेय…

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘एकदा मतदान झालं, की तुम्ही जगलात काय आणि मेलात काय, यांना (भाजप व शिवसेना) काय फरक पडणार नाही’ हे जाहीर विधान आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज यांनी भाजप व शिवसेनेच्या थापेबाजीवर जोरदार टिकास्त्र सोडले होते. राज यांनी व्यक्त केलेले भाकित सध्याच्या सत्ता संघर्षातून सत्यात येताना दिसत आहे.

‘लय भारी’ बातम्या वॉटस् अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

विधानसभा निवडणुकीत राज यांनी भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, गोरेगाव, विलेपार्ले इत्यादी ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. या प्रचारामध्ये त्यांनी बरोजगारी, शेती, शहरांचे बकालीकरण या प्रश्नांवर जोरदार फटकेबाजी केली होती. सन 2014 व सन 2019 मधील भाजप व शिवसेनेच्या जाहिरनाम्यांचीही त्यांनी चिरफाड केली होती. जाहिरनाम्यांमध्ये भाजप व शिवसेना अनेक आश्वासने देतात. पण या आश्वासनांचे ते पालन करीत नाहीत. जनताही त्यांना विचारत नाही. निवडणुका होईपर्यंत हे स्वप्ने दाखवतात. निवडणुका झाल्यानंतर जनता जगतेय की मरतेय याची भाजप व शिवसेना चिंता करणार नाही, असे भाकीत राज यांनी वर्तविले होते.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण : भाजप – शिवसेनेच्या वचनाम्याची केली चिरफाड, शाह – मोदींवरही टिकास्त्र

राज ठाकरेंचा शिवसेनेला इशारा : चौथी भाषा मुंबईत आणली तर बांबू…

मी कधीच कोणत्याही मंत्र्यांकडे पैशाची कामे घेऊन गेलो नाही : राज ठाकरेंनी ठणकावले

सध्या राज्यात शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा सत्यानाश झाला आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ मदत पोचविणे आवश्यक आहे. परंतु भाजप व शिवसेनेतील सत्ता संघर्षामुळे शेतकऱ्यांची कोणीच चिंता करीत नाही, असे चित्र दिसत आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी राज ठाकरे यांनी वर्तविलेले भाकीत निवडणुकीनंतर लगेचच खरे ठरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तुषार खरात

View Comments

  • राज ठाकरेसुद्धा पक्षीय राजकारणातले नेते आहेत. निवडणुकीपुरते आश्वासने देणे आणि निवडून आल्यानंतर ते विसरून जाणे या प्रक्रियेतून ते आणि त्यांचा पक्षही गेला आहे‌. नाशिक हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे. त्यामुळे चौफेर फटकेबाजी करता येण्यासारखी अमोघ वाणी यापलीकडे राज ठाकरे यांच्या टीकेला काहीही अर्थ नाही. ते आणि त्यांचा पक्ष निवडून आला असता तर त्यांनीही तेच केले असते. तसे नसते तर नाशिककडे इतर कोणत्याही पक्षाला मान वर करूनही बघण्याचे भाग्य लाभले नसते. आताच्या विधानसभेत मनसेचा एकमेव आमदार निवडून आला आहे. विरोधी पक्षनेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या राज ठाकरे यांची ही स्थिती आहे. विरोधात असल्यामुळे काहीही बोलता येऊ शकते, एवढाच त्याचा अर्थ आहे. मनोरंजनापलीकडे लोक त्याकडे बघत नाहीत.

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

7 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

8 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

11 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

11 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago