राजकीय

राजू शेट्टींनी ‘महाविकास आघाडी’ सरकारला ठणकावले, आंदोलनाची केली घोषणा

टीम लय भारी

मुंबई : राजू शेट्टींनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी ‘महाविकास आघाडी’ सरकारला ठणकावले आहे. पूरग्रस्तांच्या आक्रोश आंदोलनाची घोषणा केली आहे. मंगळवार (24 ऑगस्ट) रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कचेरी चौक ते प्रांत अधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार आहे. याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे (Raju Shetty slammed the Mahavikas Aghadi government).

राजू शेट्टींनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच पूरग्रस्तांच्या मागण्या पूर्ण नाही केला तर आंदोलनाची घोषणा केली आहे. महापूरामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योगधंदे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या आहेत. विहीरी खचलेल्या आहेत तसेच शेडनेट मोडकळून पडल्या आहे. या सर्वांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांना सरकारने तातडीने विनाअट नुकसान भरपाई द्यावी.

Raju Shetty : तुमची भूक नेमकी भागणार तरी कधी ? राजू शेट्टी विचारणार अंबानींना प्रश्न

Raju Shetty : मुख्यमंत्री आणि शरद पवारांवर राजू शेट्टी नाराज, ५ नोव्हेंबरला रास्ता रोको करणार

२०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची विनाअट संपूर्ण कर्जमाफी करा. पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे सोयीचे पुनवर्सन करा. कृष्णा, वारणा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळ भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा (Waiver the tuition fees and tuition fees of students in flood prone areas).

२००५ ते २०२१ पर्यंत ४ मोठे महापूर आले आहेत. या महापुरामुळे नदीकाठचे अनेक गाव उध्दवस्त झाली आहेत. यावर कायमस्वरूपी उपययोजना करण्यासाठी तातडीने अभ्यास करून त्यावर त्वरीत अंमलबजावणी करावी.

राजू शेट्टी

उध्दवा अजब तुझे सरकार! ; राजू शेट्टी गरजले

How Raju Shetti’s farmers’ union set up a Covid care centre to fight pandemic

राज्य सरकारने यापुर्वीच प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान म्हणून जाहीर केले आहे, ती रक्कम तातडीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी. तसेच २ लाखाहून अधिक थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वरील रक्कम भरण्यासाठी मुदतीची सवलत देऊन दोन लाखाचे कर्ज माफ करावे.

महापूराचे पाणी ज्या गावात गेले आहे, त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सानुग्रह अनुदान देण्यात यावे. राज्य शासनाने पुरग्रस्त शेतकऱ्यांची केलेली क्रूर थट्टा ६८ रुपये व १३२ रूपये प्रति गुंठयाचा निर्णय रद्द करून वरती सुचवले प्रमाणे मागण्या मान्य करण्यात याव्यात.

Rasika Jadhav

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

10 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

11 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

11 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago