राजकीय

रोहित पवारांची भीती अखेर खरी ठरली, हे ट्विट आलं चर्चेत

टीम लय भारी

मुंबई :- देशात 66 दिवसांनंतर इंधनाची दरवाढ करण्यात आली आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. मोदी सरकारने इंधन दरवाढ केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे एक ट्विट व्हायरल होत आहे (A tweet of NCP MLA Rohit Pawar is going viral).

पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यावर मोदी सरकार इंधन दरवाढ करणार असल्याचे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले होते. त्यांचे हे ट्विट नेटकऱ्यांकडून चांगलेच व्हायरल केले जात आहे.

कोरोनाची झळ IPL ला लागली आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित; BCCI ची मोठी घोषणा

उच्च न्यायालयाने भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांना सुनावले

West Bengal: PM Modi calls governor to express ‘serious concern’ after post-poll violence

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 2 मे रोजी म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच एक ट्विट केले होते. आता चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असे वाटू लागले आहे, असे ट्विट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले होते. त्यांचे हे भाकीत खरे ठरल्याने नेटकऱ्यांनी हे ट्विट व्हायरल केले असून त्यावर कमेंटचा पाऊसही पाडला आहे.

आज केंद्राने इंधन दरवाढ केल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा ट्विट केलं आहे. जी भीती होती, ती अखेर खरी ठरली, असे सूचक विधान रोहित यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी त्यांचे ट्विट आणि टीव्ही9 मराठीची बातमीही एम्बेड केली आहे.

इंधन दर किती वाढले?

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 27 फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. परंतु, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते. परंतु, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरु असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हते. त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरित्या कमी ठेवले जातील, असा जाणकारांचा अंदाज होता. त्यानुसार मंगळवारी पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैशांनी महागले. तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात इंधनाचा आजचा दर काय?

  • मुंबई: पेट्रोल- 96.95, डिझेल 87.98
  • पुणे: पेट्रोल- 96.60, डिझेल 86.30
  • नाशिक: पेट्रोल- 97.36, डिझेल 87.04
  • औरंगाबाद: पेट्रोल- 98.19, डिझेल 89.22

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

3 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

3 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

5 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

5 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

5 days ago