Categories: राजकीय

रोहित पवार यांचे भरपावसात आंदोलन; उद्योगमंत्री सामंतांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आज कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी मतदारसंघातील सरकारने कर्जत जामखेड येथील एमआयडीसीला मंजूरी रोखल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले. विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ते भरपावसात आंदोलना ला बसले होते. यावेळी आमदार धीरज देशमुख यांचीही उपस्थिती होती. यावेळी उद्योगमंत्री यांनी थेट आंदोलन स्थळ गाठून आमदार रोहीत पवार यांची भेट घेत त्यांची समजूत काढली. यावेळी आमदार रोहीत पवारांनी आपले आंदोलन मागे घेतले.

कर्जत जामखेड एमआयडीसीच्या प्रश्न संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सकाळीच विधिमंडात आंदोलन केले. विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हातात फलक घेत त्यांनी एमआयडीसीच्या मागणीसाठी सरकारचा निषेध केला. या एमआयडीसीला मंजूरी मिळावी म्हणून आमदार रोहित पवार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून आमदार रोहीत पवार यांनी विधानसभा प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भरपावसात आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाची दखल घेत उद्योगमंत्री यांनी यासंदर्भात तत्काळ बैठक बोलवून अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र शब्दांवर विश्वास ठेऊन आंदोलन मागे घेतोय शब्द फिरवला तर आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आज असंख्य युवक हे बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळातही एमआयडीसीसाठी पाठपुरावा केला होता. मात्र त्या काळात न जाता आताच्या सरकारने याची दखल घ्यावी म्हणून आंदोलन केले होते. उद्योगमंत्री यांनी आश्वासन दिले आहे. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेऊन आंदोलन मागे घेतले. मात्र शब्द फिरवल्यास मतदार संघातील सर्व युवकांना घेऊन मुंबईत आमरण उपोषण केले जाणार असल्याचा इशारा यावेळी आमदार रोहीत पवार यांनी दिला.

रोहित पवार म्हणाले की, कर्जत जामखेडमध्ये रोजगाराच्या अडचणी सुटव्या म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे यानिमित्त या विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे त्यामुळेच मी आंदोलन करत होतो. गेल्या वर्षभरात अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती करत होतो. मात्र राज्य सरकारकडून कुठलेही ठोस पाऊले उचलण्यात येत नव्हते. त्यामुळे अधिवेशनादरम्यान आज आंदोलन करण्याकरिता बसलो होतो. आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे एमआयडीसीसाठी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याला मध्यवर्ती ठरणारी कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली होती. पाटेगाव व खंडाळा येथील क्षेत्राची सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूनिवड समितीने 18 नोव्हेंबर 2021 रोजी पाहणी केली होती. त्यानंतर या क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण जानेवारी 2022 मध्ये करण्यात आले. 14 जुलै 2022 रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा तालुका कर्जत येथील 458.72 हेक्टर क्षेत्राला तत्वत मान्यता देण्यात आली. मात्र पुढे याची अधिसूचना निघाली नाही. त्यासाठी आमदार पवार यांनी हिवाळी अधिवेशनात 23 डिसेंबर 2022 रोजी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे याकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे याला सरकारने तत्वत मान्यता देण्यात आल्याची बाब मान्य केली होती. त्यानंतरही पवार यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.

विवेक कांबळे

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago