राजकीय

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावरून फडणवीसांना रोहित पवारांचे चोख प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये असलेल्या मुद्दयांवरून आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर दिले आहे (Rohit Pawar has given an honest reply to Devendra Fadnavis).

या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार करत असलेल्या उपाय योजनांबाबत काही मुद्दे मांडले होते. दरम्यान या मुद्द्यांवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आक्षेप घेतला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उत्तर दिले आहे. राज्य सरकार, आरोग्य आणि इतर यंत्रणा कसे काम करत आहे, हे मी जवळून पाहतो आहे. त्यांच्या या कष्टावर राजकीय हेतूने कुणी पाणी फिरवत असेल तर ते योग्य नाही, त्यामुळे वस्तुस्थिती पुढे यावी म्हणून ही पोस्ट लिहिल्याचे रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटले आहे.

कोरोना लसीकरणाबाबत नितीन गडकरी यांचा मोदी सरकारला सल्ला

मराठा आरक्षणासाठी आता मोर्चा काढण्याची योग्य वेळ नाही : संभाजी राजे

रोहित पवार म्हणाले, “आजची वेळ ही राजकारण करण्याची नसून या संकटाला रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आहे. आज खरंतर भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रातील नेत्यांना पत्र लिहून महाराष्ट्राला मिळणाऱ्या मदतीचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. परंतु, आजपर्यंत एकाही नेत्याने ते धारिष्ट्य दाखवल्याचे दिसत नाही. पण राज्य संकटात असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी केंद्राच्या ‘पीएम केअर’मध्ये मदत जमा करण्याचे मात्र त्यांनी न विसरता आवाहन केले.”

Amid Covid crisis, Modi’s popularity rating drops to a new low for first time in 7 years: Report

देवेंद्र फडणवीस यांनी, सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्रात, केंद्र सरकारने महाराष्ट्राची सर्व मदत केल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत रोहित पवार म्हणाले, “कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आता लस वाटपापर्यंत महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच झाला. राज्यात रुग्णसंख्या सर्वाधिक असूनही भाजपशासित राज्यांना प्राधान्य देण्यात आले. केंद्रीय अर्थसंकल्पात ३५००० हजार कोटींची तरतूद असतांनाही आर्थिक अडचणीतून जात असणाऱ्या राज्यांवरच लसीकरणाचा अधिकचा भार केंद्राने टाकला. पहिल्या लाटेनंतरही केंद्राला निर्णायक धोरण आखायला विलंब लागल्यामुळे पुरेसा वेळ हातात असतांनाही आपली देशाची लसीकरण क्षमता वाढवली नाही. तरीही राज्य शासन आपल्या परीने सर्व प्रयत्न करत आहे.”

विरोधीनेते नेहमी राज्य सरकारवर कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवल्याचा आरोप करतात. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील मुंबईत मृत रुग्णांची आकडेवारी लपवल्याचा आरोप राज्य सरकारवर केला होता. हे आरोप फेटाळत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक सवाल केला आहे. “मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने सातत्याने उपाय योजना करून मुंबईतील मृत्यूदर नियंत्रणात आणला. ज्या राज्याचे आपणही नागरिक आहात त्या राज्यात आणि राजधानीत करोनाचा आलेख स्थिरावतोय ही बाब आपल्याला आनंद देणारी का नाही?”, असा सवाल रोहित पवारांनी (Rohit Pawar) केला.

गुजरातमधील गौडबंगाल काय? यावर राज्यातील विरोधी पक्ष गप्प का?’

“भाजपाशासित गुजरातमध्ये १ मार्च ते १० मे २०२१ दरम्यान १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू प्रमाणपत्र दिले आणि प्रत्यक्षात मात्र या कालावधीत केवळ ४२१८ मृत्यू करोनाने झाल्याची नोंद केली. पण गेल्यावर्षी याच कालावधीत दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रांची तुलना केली. तर यंदा तब्बल १.२० लाख मृत्यूचे दाखले अधिक देण्यात आले. याचं गौडबंगाल काय? यावर राज्यातील विरोधी पक्ष गप्प का आहे?” असा प्रश्न रोहित पवारांनी (Rohit Pawar) विचारला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले “आकडेवारी कमी दिसावी म्हणून महाराष्ट्रात आकड्यांमध्ये फेरफार केलेला नाही. कोणतीही आकडेवारी लपवली नाही. जे सत्य आहे ते स्वीकारून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपले महाविकास आघाडी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.”

Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

5 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

6 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

6 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago