राजकीय

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे(Sanjay Dina Patil from Shiv Sena VS Mihir Kotecha from BJP in North East Mumbai Lok Sabha Constituency). मतदारसंघातील समस्या, मूलभूत प्रश्न जाणून घेण्यासाठी ‘लय भारी’ची टीम मतदारसंघातील कन्नमवार नगर, विक्रोळी या ठिकाणी पोहचली. धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात गेल्यानंतर या ठिकाणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कन्नमवार नगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी समस्या मांडणारे एक निवेदन उमेदवार संजय दिना पाटील व मिहिर कोटेचा या दोन्ही उमेदवारांना दिले आहे. दोन्ही उमेदवारांनी केवळ तोंडी आश्वासने दिली आहेत. डंपिंग ग्राऊंड, गटारे, मैदाने अशा १६ प्रकारच्या तीव्र समस्या कन्नमवारनगरला भेडसावत आहेत. या समस्यांचे निराकरण करणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. पण लोकप्रतिनिधींना निवडणुका जवळ आल्या की, त्यांना जनतेची आठवण होते. एरवी ते जनतेकडे ढुंकूनही बघत नाहीत, अशी नाराजी येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

29 mins ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

1 hour ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

2 hours ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

22 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

23 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

23 hours ago