राजकीय

संजय राऊतांचा राज्यपाल कोश्यारींना टोमणा; ट्विटवरून केली टीका

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांना वाढदिवसानिमित्त राज्यासह देशभरातील नेते शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांना आपल्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत (Shiv Sena MP Sanjay Raut has also congratulated the Governor in his style).

“महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील. जय महाराष्ट्र!,” असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. संजय राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या (Sanjay Raut congratulated Governor Koshyari on Twitter).

आरक्षणावरून संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तर उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे, आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका; राऊतांचा भाजपला खोचक टोला

Assam saw 28,000 more deaths than normal in months when first wave of Covid-19 struck

गेल्या आठ महिन्यांपासून विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्या प्रलंबित असल्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल (Governor) यांच्यात संघर्ष सुरु आहे. यातच, विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी राज्य मंत्रिमंडळाने पाठविलेली यादी ही राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) महोदयांकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजभवनाकडे ही यादीच उपलब्ध नसल्याचे वृत्त मध्यंतरी एका माहिती अधिकाराच्या अनुषंगाने देण्यात आले होते. परंतु, ही यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडेच असल्याची माहिती समोर आली आहे.

12 आमदारांची यादी 7 महिन्यांपासून राज्यपालांकडेच

ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर 15 जून रोजी सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचे त्यांना कळवण्यात आले. तर दुसरीकडे 12 आमदार यांच्या नियुक्तीबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 12 आमदारांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, 25 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांना सादर केली. यादी सादर करुन 7 महिने उलटले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

जर केसांची लांबी वाढत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ एक गोष्ट

केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…

3 hours ago

Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…

4 hours ago

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

22 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

1 day ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

1 day ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago