राजकीय

संजय राऊतांनी भाजपच्या १०० भ्रष्ट व्यक्तींची नावं जाहीर करण्याचा दिला इशारा!

टीम लय भारी

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत( Sanjay Raut) यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमध्ये तब्बल ५०० ते ७०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारं पत्र भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना पाठवलं होतं. यासंदर्भातली पुराव्यांची फाईलच आपण किरीट सोमय्यांना पाठवल्याचं संजय राऊत म्हणाले. मात्र, आता भाजपाशी संबंधित अशी १०० नावं देणार असल्याचा इशारा राऊतांनी दिला आहे (Sanjay Raut warns to announce names of 100 corrupt BJP persons).

ही सुरुवात असून अजून ९९ नावं मी देईन, माझं काय वाकडं करायचंय ते करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपाला इशारा दिला आहे. तसेच, पुराव्यांची फाईल तुम्हाला पाठवली आहे, आता हा घोटाळा उघड करा, असं आव्हान देखील राऊतांनी किरीट सोमय्यांना दिलं आहे.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

पंजाबमधील राजकीय गोंधळामागे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा सहभाग; शिवसेनेचा हल्लाबोल

“भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे शिरोमणी..किरीट सोमय्या!”

“पिंपरी चिंचवडमध्ये ७०० कोटींचा घोटाळा दिसतोय. स्मार्ट सिटी हा केंद्राचा प्रकल्प आहे. देशभरात या प्रकल्पात जे घोटाळे सुरू आहेत, त्यातला एक शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी समोर आणला आहे. पण कुणी दखल घ्यायला तयार नाही. तुम्ही महाविकासआघाडीच्या ५० लाख, १० लाखांवर चौकशी करत आहेत. कायदेशीर व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. किरीट सोमय्या हे सगळं करत आहेत.

पंतप्रधान म्हणतात जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मग हा देखील जनतेचाच पैसा आहे. ती सगळी फाईल आम्ही भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे शिरोमणी असलेल्या किरीट सोमय्यांना पाठवली आहे. आता त्यांनी हा घोटाळा बाहेर काढावा आणि संबंधितांना तुरुंगात पाठवावं”, असं राऊत म्हणाले.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारे भाजपचे नेते आता मूग गिळून गप्प

Maharashtra: Shiv Sena MP Sanjay Raut alleges corruption of over Rs 500 crore in BJP-ruled corporation

“मी घोषणा केली होती की भाजपासंदर्भातली १०० नावं मी अशी देईन ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयनं कारवाई करायला हवी. हे त्यातलं पहिलं नाव आहे. अजून ९९ नावं पुराव्यांसह देणार मी. हे त्या १०० जणांच्या यादीतलं १००वं नाव आहे. आता मी सुरुवात करेन. मला बघायचंय की कारवाई होणार की नाही. यात सगळे प्रमुख लोक आहेत. सगळे भ्रष्टाचाराच्या गंगेत डुबक्या मारत आहेत हे सगळं माझ्याकडे आहे. मी ते देणार”, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊतांनी बुधवारी किरीट सोमय्या यांना एक पत्रच पाठवलं आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला, ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा. असं संजय राऊत यांनी पत्राद्वारे आवाहन केलं आहे. तसेच, पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरवा करतील, अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

15 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

17 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

18 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 days ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 days ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 days ago