राजकीय

SEBC : मराठा समाजाला सरसकट OBC कोट्यातून आरक्षण द्या, अन्यथा…

टीम लय भारी

पुणे : मराठा समाजाला एसीबीसी (SEBC) प्रवर्गातून दिलेले आरक्षण कायद्याने टिकणार नाही, यामुळे समाजाचे नुकसानच होईल. हे संभाजी ब्रिगेडने वारंवार स्पष्ट केले आहे. कारण एसीबीसी आरक्षण फसवे आहे. त्यातून समाजाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार नाही.

राज्य सरकारने घटनात्मक पद्धतीने स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाच्या समितीने मराठा समाजासाठी दिलेले आरक्षण घटनात्मक आहे. मराठा-कुणबी व कुणबी-मराठा एकच असून हा समाज सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे असे मागासवर्ग आयोगाने राज्य व केंद्र सरकारकडे अहवालाव्दारे कळवले आहे. मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून उपेक्षित ठेवले जात आहे. त्यामुळे नोकर भरती थांबली, प्रमोशन रखडले व विद्यार्थी महाविद्यालयीन व इतर प्रवेशापासून वंचित ठेवले गेले आहेत हा सत्ताधारी व विरोधक विरोधी पक्षाचा ‘गेम प्लॅन’ आहे. आरक्षण देण्यात प्रस्थापित राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती नाही हा संघर्षात्मक आंदोलन करणा-या व आरक्षणासाठी स्वतःचा प्राण घेणार्‍या प्रत्येक आंदोलकाचा सरकारने ठरवून केलेला खुन आहे.

राज्य सरकार व विरोधी पक्ष मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यांना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा नाही, म्हणून वेळकाढूपणा करत आहेत. परंतु यामध्ये मराठा समाजाची एक पिढी बरबाद होत आहे, हे सरकार व नेत्यांना दिसत नाही का.’ भारतीय संविधान सर्वांना समान आहे. घटनात्मक चौकटीत सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून केंद्र सरकारने मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदे मध्ये केली आहे.

भारतात होणा-या 2020-21 च्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची (OBC) सरसगट जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे. अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे तसेच मराठा समाजाला सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाले पाहिजे अन्यथा यापुढे शांत न बसता संभाजी ब्रिगेड ठाकरे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करणार आहे तरी राज्य सरकारने तात्काळ निर्णय जाहीर करावा. यापुढे शांत बसुन चालणार नाही.

यावेळी पुण्यातील पत्रकार परिषदेत… संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे मध्ये जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, मोहिनी रणदिवे, जयदीप रणदिवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago