Categories: राजकीय

शांतिगिरी महाराज करणार नरेंद मोदींचा प्रचार

नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात उभे असलेले शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) आता पंतप्रधान नरेंद मोदी यांचा प्रचार करणार आहेत. जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतिगिरी महाराज हे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांनी नाशिक लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली आहे. 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj ) यांनी माघार घ्यावी यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांनी माघार घेण्यास नकार दिला.(Shantigiri Maharaj to campaign for Narendra Modi )

नाशिक लोकसभेसाठी महायुतीत मोठी रस्सीखेच होती. महायुतीकडून हेमंत गोडसे, छगन भुजबळ, शांतिगिरी महाराज, दिनकर पाटील इच्छुक होते. मात्र नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आग्रही होती. तर शांतिगिरी महाराज भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते. मात्र विद्यमान खाजदार शिवसेनेचा असल्याने ही जागा अखेर शिवसेनेला सुटली. यानंतर शांतिगिरी महाराज हे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

बिजेपीनी केली मनधरणी

शांतिगिरी महाराज यांनी गेल्या एक ते दीड वर्षापासून निवडणुकीची तयारी सुरू केली. मात्र त्यांना एकाही पक्षाने उमेदवारी दिली नाही. अखेर त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. आता नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत रंगली. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने शांतिगिरी महाराज यांची मनधरणी करण्याचा प्रयन्त केला. मात्र त्यांनी आता माघार नाही… आता लढायचं आणि जिंकायचं …. असं म्हणत प्रचाराला सुरवात केली.

नरेंद मोदी आणि शांतिगिरी भेट

15 मे रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांची नाशिकच्या पिंपळगाव येथे महायुतीच्या उमेदवारा करिता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र वाहतुकीत अडकल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याच शांतिगिरी महाराज यांनी सांगितलं.

शांतिगिरी महाराज करणार मोदींचा प्रचार

पाचव्या टप्प्यात नाशिकची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच उमेदवार निवांत झाले असून नित्याच्या कामाला लागले आहेत. शांतिगिरी महाराज सुद्धा त्यांच्या कामाला लागले आहेत. २८ मे ते ४ जूनदरम्यान वाराणसी येथे जर्नादन स्वामी आश्रमात जपानुष्ठान ठेवण्यात आले. त्यानिमित्ताने शांतीगिरी महाराज रवाना होत आहेत. मात्र, रवाना होण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपण प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदर्शवत आहेत, तसेच त्यांच्याशी आपले विचार जुळत असल्याने आपण त्यांचा प्रचार करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. मोदींचा प्रचार करणार म्हणजे भाजपाचा प्रचार करणार काय, याबाबत बोलताना ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले. यामुळे 4 जून नंतर शांतिगिरी महाराज भारतीय जनता पक्षाचा प्रचार करताना दिसले तर नवल वाटायला नको.

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

41 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago