राजकीय

गोपीचंद पडळकरांनी टीका केली ते बरेच झाले, पवारांचा ‘खरा’ चेहरा समोर आला

उन्मेष खंडागळे

नवोदित आमदार गोपीचंद पडळकर यांनी विखारी टीका केल्यानंतर अद्याप तरी शरद पवारांनी त्यांना ठोस प्रत्युत्तर दिलेले नाही. पुण्यात व साताऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी पडळकर ( Sharad Pawar avoided to react on Gopichand Padalkar’s statement ) यांच्यावर बोलण्याचे टाळले.

पडळकरांनी मर्यादा सोडून आणि खालच्या पातळीवरील टीका केल्यानंतर आता शरद पवारांचे एक – एक गुण समोर येत आहेत.

शरद पवारांनी त्यांच्या पन्नास वर्षांच्या संसदीय राजकारणात केलेल्या कामाची जंत्रीच समोर येत आहे. बारामतीमधील शेती आणि उद्योग पाहण्यासाठी देशोदेशीचे अभ्यासक येऊन जातात. पडळकर सध्या ज्या पक्षाच्या कोट्यातून विधानपरिषदेत गेले आहेत त्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बारामतीचा ‘विकास’ पाहण्यासाठी येतात ( Narendra Modi’s visit to Baramati ).

हे सुद्धा वाचा

पडळकरांच्या आडून भाजपने धनगर विरूद्ध मराठा भांडण लावले : अनिल गोटे यांचा आरोप

शरद पवार म्हणाले, ‘गोपीचंद पडळकरांविषयी मला बोलायचे आहे, पण…’

गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर नेतेही संतापले

पवारांनी पुण्याला उद्योग नगरी केले. त्यामुळेच पुणं आज आयटी हब झाले, हे पवारांचे विरोधकही मान्य करतात (Sharad Pawar developed to Pune ) . महाराष्ट्रात रुजलेली सहकार चळवळ पवारांनी भरभराटीस आणली. आज याच सहकारात घुसण्याचा आणि ग्रामीण राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न भाजप नेतेही जोमाने करत आहेत.

पवारांनी फक्त पुण्यातच उद्योग आणले नाहीत तर राज्यातील इतरही शहरात औद्योगिकीकरणाची चक्रे गतीमान केली. कृषी हा तर पवारांचा आवडता प्रांत. देशातून जगाला धान्याची निर्यात झाली तीही पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना. फळबागा, गटशेती हे नवे प्रयोगही त्यांनी राबवले. यशस्वी करुन दाखवले.

मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न, सतरा वर्षे मराठवाडा त्यामुळे धुमसत होता. सत्ता जाण्याची खात्री असतानाही शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी नामांतराचा निर्णय घेतला. महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण दिले. त्यासोबतच संरक्षण मंत्री असताना महिलांना सैन्यदलात भरती करण्याचा निर्णय घेतला. हे फुले -शाहू -आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या पवारांकडूनच शक्य झाले.

पवारांनी काय काय केले हे नव्वदीनंतरच्या पिढीला तेवढे माहित नाही. कारण ही जाहिरातीवर पोसलेली पिढी. या जुन्या जाणत्या नेत्यांना जाहिरातीचा सोस नव्हता. आयटीवर पोसलेल्या पिढीला ‘आयटी सेल’ने जे दाखवलं तेच सत्य आणि 2014 नंतरच देश स्वतंत्र झाल्यासारखे वाटायला लागले.

कोटावर गुलाब असलेले नेहरु, फाळणीवाले गांधी, आणि फक्त राज्यघटना लिहणारे, आरक्षण देणारेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाखवण्यात आले. पण या नेत्यांचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की, देशाच्या कणाकणांत त्यांचे अस्तित्व आहे. तुम्ही – आम्ही आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहावे एवढा त्यांचा त्याग व समर्पण आहे.

नेहरू, गांधी यांचा हाच वारसा यशवंतराव चव्हाणांनी चालवला आणि पुढे शरद पवार तो घेऊन निघाले आहेत. हे सगळं स्मृतीपटलावरुन धुसर होत चाललं होतं. तेव्हा गोपीचंद पडळकर तुम्ही पवारांबद्दल विखारी भाषा वापरुन फार चांगले केले. पवारांसह जाणत्या नेत्यांचे हे कर्तृत्व नव्या पिढीसमोर ठेवण्याला निमित्त मिळालं.

तुषार खरात

Recent Posts

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

1 hour ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

1 hour ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

15 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

16 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

18 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

18 hours ago