राजकीय

शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर शरद पवारांसोबत बंद दाराआड चर्चा

टीम लय भारी

सातारा : जिल्हा बँकेचे निकाल नुकतेच लागले या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली(Sharad Pawar met Shashikant Shinde).

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहामध्ये खासदार श्रीनिवास पाटील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

Sharad Pawar : फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत क पात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन

Sharad Pawar : शरद पवार, अजित पवारांचे तरूणांच्या कल्याणासाठी मोठे पाऊल

पराभवाचा वचवा काढणार

या चर्चेनंतर आमदार शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याचे ते म्हणाले.

याबरोबरच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सातारा आणि जावळी या ठिकाणी लक्ष केंद्रीत करणार असून, सातारा नगरपालिकेची निवडणूक एक हाती जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त  केला आहे.

Sharad Pawar : ‘शेतकरी दिना’निमित्त शरद पवारांचं खास Tweet ! म्हणाले…

Raut Meets Pawar, Says “Hopeful Of MSRTC Workers Strike Ending Soon.”

शशिकांत शिंदेंचा निसटता पराभव

दरम्यान जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली.

पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले  शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून, त्यांनी विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव केला.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

5 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago