Categories: राजकीय

धनगर, मुस्लीम आरक्षणाला शरद पवारांची बगल, वंचितच्या नेत्यांचा राष्ट्रवादी प्रवेश खोळंबला

टीम लय भारी

मुंबई : वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा पक्षाने केली आहे. परंतु धनगर व मुस्लिम आरक्षणाला शरद पवारांनी कोणतेही ठाम आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे स्पष्टीकरण या नेत्यांनी दिले आहे. आम्ही प्रवेश केलेला नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्धीपत्रक काढून आमच्या प्रवेशाच्या खोट्या बातम्या पसरविल्याचा आरोपही या नेत्यांनी केला आहे.

वंचितमधून बाहेर पडलेले माजी आमदार हरिदास भदे, बळीराम शिरसकर, नवनाथ पडळकर, अर्जून सलगर आदी 150 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शरद पवार यांच्यासोबत तीन दिवसांपूर्वी मुंबईत बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ हे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत वंचितमधून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या वतीने पडळकर यांनी शरद पवार यांच्यासमोर 12 कलमी राजकीय व सामाजिक मुद्दे मांडले. या मुद्द्यांवर पवार सकारात्मक असतील तर प्रवेश करू अशी भूमिका या नेत्यांची होती. त्यावर पवार यांनी या नेत्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर मागासवर्गीयांची जनगणना तामिळनाडूच्या धर्तीवर करावी, धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे, मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागण्यांना पवार यांनी बगल दिली. त्यामुळे आमचे समाधान झाले नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय झाला नाही. पण त्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रसिद्धीपत्रक काढून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या खोट्या बातम्या पसरविल्या. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुढील चर्चा करण्यात अडथळे निर्माण झाल्याचे नवनाथ पडळकर यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, माजी आमदार हरिदास भदे यांनीही पत्रक जारी केले आहे. आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. परंतु आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करूनच प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असे भदे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या मार्गावर, नरेंद्र मोदींची घेतली भेट

खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दत्तात्रय भरणेंनी धनगर समाजाच्या आंदोलकांशी साधला संवाद

मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात नवे खासगी सचिव

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago